एक महिन्यानंतर एमीच्या चिमुकल्याची झलक

मुलाच्या जन्माच्या एका महिन्यानंतर तिने एक गोड व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Updated: Oct 18, 2019, 04:32 PM IST
एक महिन्यानंतर एमीच्या चिमुकल्याची झलक  title=

मुंबई : एक महिन्यापूर्वी एमी जॅक्सनने एका गोंडस मुलाला जन्म दिला. एमी आणि तिचा जोडीदार, प्रियकर जॉर्ज यांच्या आयुष्यात या छोट्या पाहुण्याच्या येण्याने ही जोडी सध्या भलतीच आनंदात आहे. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या या अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील खास क्षण सुरुवातीपासूनच सर्वांच्या भेटीला आणले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Birthday my beautiful son  1 month old today. I can’t remember life before you... you’ve completed me in ways I can’t describe. I’m thankful for every second I spend with you and the love I have for you is infinite. I can’t wait to watch you grow into a strong, kind, caring young man  Thankyou to my wonderful consultant drduncanbirth for the constant support throughout my pregnancy and making the birth itself such an amazing experience. HAPPY 1 MONTH BABY AP 

 

मुलाच्या जन्माच्या एका महिन्यानंतर तिने एक गोड व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा आणि तिच्या मुलाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. एमीने तिच्या मुलाचे नाव एन्ड्रियास असे ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या मुलाचे फोटोशूट देखील केले होते.

एमीने जॉर्जच्या वडिलांच्या नावारून त्यांच्या मुलाचे नाव ठेवले आहे. एमी मुलाच्या जन्मानंतर प्रियकर जॉर्जसोबत साखरपुडा केला आहे, तर पुढच्या वर्षी हे दोघे विवाह बंधनात अडकणार आहेत. 'बीच वेडिंग' या थीमअंतर्गत ते कायमस्वरुपी एकमेकांची साथ निभावण्याची वचनं देणार आहेत. 

यासाठी ग्रीस येथे त्यांच्या लग्नसोहळ्याचा थाट पाहायला मिळणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. याविषयी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.