'कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ गाणं ऐकताच अमृता फडणवीसांना कोणाची आठवण येते? पाहा काय म्हणाल्या

अमृता यांनी 'बस बाई बस' या शोमध्ये हे वक्तव्य केलं आहे. 

Updated: Aug 5, 2022, 07:03 PM IST
'कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ गाणं ऐकताच अमृता फडणवीसांना कोणाची आठवण येते? पाहा काय म्हणाल्या title=

मुंबई : ‘झी मराठी’वर नुकताच ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या कार्यक्रमाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे करत आहे. या कार्यक्रमाची थीम महिलांवर आधारित आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो समोर आला आहे. यावेळी कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. अमृता यांनी या भागात बऱ्याच गोष्टी शेअर केल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळालं आहे. 

अमृता नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. त्यांना गाण्याची आवड असून त्यांचं नवं गाणं नुकतंच भेटीला आलं आहे. अमृता यांच्या बऱ्याच वक्तव्यांनी सुद्धा त्यांना प्रकाशझोतात आणलं आहे. एकंदरच कार्यक्रमाचा प्रोमो बघून एपिसोड धमाल आणि रंजक असणार असा संकेत मिळत आहे. या भागात अमृता फडणवीस एका खास गोष्टीचा खुलासा करताना दिसणार आहे. प्रेक्षक महिला सेलिब्रेटी पाहुणीला भन्नाट प्रश्न विचारून भंडावून सोडत असतात. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये बॅकग्राऊंडला ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ हे गाणं प्ले होतं. त्यावेळी सुत्रसंचालक सुबोध भावे अमृता यांना प्रश्न विचारतो की हे गाणं ऐकल्यावर तुम्हाला कोणाची आठवण येते. यावर त्या उत्तर देत अमृता म्हणतात की, 'उद्धवजी ठाकरे यांचा खूप मान आणि सन्मान. पण हे गाणं ऐकल्याबरोबर मला त्यांचाच चेहरा आठवला.' अमृता यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत दिलेलं हे उत्तर ऐकून नेटकरी यावर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. 

काही नेटकऱ्यांनी अमृता यांना ट्रोल केले आहे तर काहींनी अमृता यांची बाजू घेतली आहे. याशिवाय त्या गळ्यात मंगळसुत्र का घालत नाहीत आणि त्यांनी प्लास्टिक सर्जरी केली आहे का? अशा अनेक प्रश्नांच अमृता यांनी उत्तर दिलं आहे.