मुंबई : आज हिंदी चित्रपटसृष्टीतल्या त्या दिग्गज कलाकाराची पुण्यतिथी आहे ज्यांची स्क्रीन प्रेजेंस इतका दमदार होता की त्यांची मोठ्या पडद्यावर एंट्री झाली की, थिएटरमध्ये शिट्ट्या वाजू लागायच्या. अमजद खान 52 वर्षांचे असताना त्यांनी जगाला निरोप दिला. त्यांनी आपल्यामागे सोडल्या त्या अविस्मरणीय अभिनय आणि स्वतःशी निगडित आठवणी. आज, अमजद खानच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही तुमच्यासाठी त्याच्याशी संबंधित एक अविस्मरणीय घटना शेअर करणार आहोत, ज्यामुळे शोलेच्या या गब्बरचं संपूर्ण आयुष्य बदललं. ते मृत्यूच्या दारातून परत आले होते. हा किस्सा अमिताभ बच्चन आणि अमजद खान यांच्या मैत्रीचे अतूट बंधदेखील दर्शवतात.
गोव्याला जात असताना भीषण अपघात झाला
ही घटना आहे 1978 सालची. अमजद खान पत्नी आणि दोन्ही मुलांसह मुंबईहून गोव्याला रवाना झाले. फिल्म द ग्रेट गॅम्बलर चित्रपटाचं शूटिंग गोव्यात सुरू होतं. सिनेमाची पत्रकार भावना सौम्य तिच्या एका कार्यक्रमात म्हणाली की शूटिंगसाठी अमजद खान यांना त्वरित गोव्याला पोहचावं लागलं.काही कारणास्तव फ्लाइट आणि ट्रेनची तिकिटे मिळाली नाहीत, यामुळे स्वत: अमजद खान यांनी कारने गोव्याला जाण्यासाठी योजना आखली. संपूर्ण कुटुंब गोव्यात पोहोचणार होतं मात्र यानंतर काही किलोमीटर अंतरावर जावून अमजद खान यांच्या कारचा अपघात झाला.
या घटनेचा संदर्भ देताना अन्नू कपूर यांनी आपल्या एका कार्यक्रमात सांगितलं की, या अपघातात अमजद खान आणि त्याच्या कुटुंबाला गंभीर दुखापत झाली आहे. कारचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. काही स्थानिक लोकांच्या मदतीने अमजद आणि त्याच्या कुटुंबियांना गोव्यातील पंजिम येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. अमजद खानची प्रकृती चिंताजनक होती. त्यांचे रिब्स तुटले होते आणि त्याच्या फुफ्फुसांनाही ईजा झाली आहे. स्थिती अशी बनली होती की, ते कोमात जाण्याची शक्यता वाढत चालली होती. डॉक्टरांना त्वरित त्याचं ऑपरेशन करावं लागलं.
अमिताभ बच्चन ठरले देवदूत
या रोड अपघातात अमजद खान यांनी आपलं बरंच रक्त गमावलं होतं. त्यांना रक्ताची गरज होती. अशा परिस्थितीत अमिताभ बच्चन यांनी त्यांना त्यांचं रक्तदान केलं. अमजद खान यांचं ऑपरेशन सुमारे 12 तास चाललं. तोपर्यंत अमिताभ तिथल्या रूग्णालयाच्या सोफ्यावर बसले आणि आपल्या मित्राच्या आरोग्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. अमिताभ आणि अमजद यांच्या चाहत्यांची प्रार्थनेमुळे त्यांचे प्राण वाचले असं म्हणणं वावगं ठरणार नाही. काही काळ पंजिमच्या रूग्णालयात राहिल्यानंतर त्यांना मुंबईतील नानावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिथून ते बरे झाल्यानंतर घरी परतले.
अपघातानंतर चित्रपट कमी मिळू लागले
या अपघातानंतर बरेच बदल झाले होते. हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान अमजद खान यांना बरीच स्टिरॉइड्स देण्यात आली होती, त्यामुळे त्यांचे शरीर फुगू लागलं. काही वेळातच त्यांचं वजन खूप वाढलं. आधी ज्याप्रकारे त्यांना चित्रपटांच्या ऑफर येत होत्या त्या मिळणं बंद होत गेल्या. वजन वाढल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि 27 जुलै 1992 रोजी त्यांनी जगाला निरोप दिला.