मुंबई : सिने इंडस्ट्रीची सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि हवाहवाई गर्ल श्रीदेवी यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या चांदनीला निरोप देताना बॉलीवूड जगतासह अनेक चाहते भावुक झाले होते.
श्रीदेवीच्या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने चाहते सहभागी झाले होते. श्रीदेवीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केलेय ज्याचे कनेक्शन जावेद अख्तरशी आहे.
T 2729 -
"रहने को सदा देहर में आता नहीं कोई
तुम जैसे गये ऐसे भी जाता नहीं कोई"~ कैफ़ि आज़मी.देहर - means .. the world .
Javed Akhtar narrated this sher to me at funeral of Sridevi .. said it was written at time of Guru Dutt demise ; but so appropriate for today ..— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 28, 2018
श्रीदेवीच्या अंत्ययात्रेत अमिताभही सहभागी झाले होते. बुधवारी संध्याकाळी श्रीदेवीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर अमिताभ यांनी ट्विट केले. या ट्विटमध्ये अमिताभ यांनी कैफी आजमीची एक शायरी सादर केलीये. रहने दो सदा देहर में आता नहीं कोई, तुम जैसे गये एेसे भी जाता नहीं कोई। अशी ही शायरी आहे. यानंतर अमिताभ पुढे म्हणतात, ही शायरी जावेद अख्तर यांनी श्रीदेवींच्या अंत्यसंस्कारावेळी ऐकवली होती. प्रसिद्ध दिग्दर्शक गुरु दत्त यांच्या निधनानंतर लिहिली होती.
ज्या रात्री श्रीदेवींचे निधन झाले त्याच्या दोन तास आधी अमिताभ यांनी ट्विट केले होते. यात त्यांनी न जाने क्यूं, एक अजीब सी घबराहट हो रही है। असं म्हटलं होतं. त्यानंतर लगेचच श्रीदेवींचे निधन झाल्याने या ट्विटशी संबंध जोडण्यात आला होता.