Amitabh Bachchan Arrested : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून ट्रॅफिक रूल मोडण्या प्रकरणी चर्चेत आले होते. त्यांना त्या साठी फाईन देखील बजावण्यात आलं होतं. आता अमिताभ बच्चन यांचा एक फोटो समोर आला असून त्यावरून त्यांना अटक झाली की काय असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वत: हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यांच्या फोटोवर कमेंट करत अमिताभ यांच्या चाहत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत अमिताभ हे मुंबई पोलिसांच्या गाडी समोर उदास उभे असल्याचे दिसत आहे. यावेळी अमिताभ यांनी चेक्स्चं एक शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. तर हा फोटो शेअर करत अमिताभ यांनी स्वत: अटक झाली असं कॅप्शन दिलं आहे. तर या फोटोतही अमिताभ हे उदास असले तरी देखील स्टाईलमध्ये उभे आहेत. अमिताभ बच्चन या पोजमधे काहीतरी विचार करताना दिसत आहे. अर्थातच बिग बींनी हे विनोदी अर्थाने म्हटले आहे. हा फोटो त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा असू शकतो किंवा नेहमीप्रमाणे एक जुना फोटो असू शकतो अशा चर्चा सुरु आहेत.
शिवाय हेल्मेट न घातल्याने त्यांच्यावर टीका देखील करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केल्याचं देखील म्हटले जात आहे. आता पोलिसांच्या गाडीसमोर फोटो काढल्यानं ते चांगलेच चर्चेत आले आहेत. आता या फोटोवर नेटकरी मजेदार कमेंट करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, डॉन को पकडना मुश्किल ही नहीं नामुमकिन है सर. दुसरा नेटकरी म्हणाला, भूतनाथला कोणीही अटक करू शकत नाही अशी आणखी एक मजेदार कॉमेंट एका नेटकऱ्यानं केली आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, अखेर डॉनला मुंबई पोलिसांनी पकडलं. आणखी एक नेटकरी म्हणाला, तुम्हाला कोण अटक करू शकतं. कोणाची इतकी हिंमत के दिलेरची छेड काढेल. दुसरा नेटकरी म्हणाला, जया जी यांच्यावर असलेला सगळा राग तुमच्यावर निघतो. त्यांना सांगा जर विचार करून बोला.
हेही वाचा : Pushpa 2 च्या सेटवरून समोर आला Fahad Faasil चा पहिला लूक, असा दिसेल भंवर सिंह शेखावत
खरं तर अमिताभ यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून एक फोटो शेअर करत कसं त्या बाईक चालवणाऱ्या माणसानं त्यांना सेटवर पोहोचवलं हे सांगितलं होतं. अमिताभ त्या व्यक्तीला ओळखतही नव्हते पण त्यानं मदत करणं ही खूप मोठी गोष्ट आहे