'लग्न करेन पण...' मंडपात ऐनवेळी अमिताभ बच्चन यांनी सासरच्यांसमोर ठेवलेली 'ही' अट

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला यावर्षी 50 वर्षे पुर्ण झाली आहेत. सध्या 'कौन बनेगा करोडपती' चे 15 वे सिझन सुरू आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या लग्नाचा एक रंजक किस्सा सांगितला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 18, 2023, 04:00 PM IST
'लग्न करेन पण...' मंडपात ऐनवेळी अमिताभ बच्चन यांनी सासरच्यांसमोर ठेवलेली 'ही' अट title=
amitabh bachchan reveals that he refused to wear topor at the time of the wedding

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाचे अनेक किस्से लोकप्रिय आहेत. त्यांच्या लग्नाला यावर्षी 50 वर्षेही पुर्ण झाली आहेत. त्यांच्या लव्हस्टोरीकडे पाहून आपल्या सर्वांनाही असंच वाटतं की प्रेमकहाणी असावी तर अशीच. सध्या अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या लग्नाचा एक किस्सा सांगितला आहे. तुम्हाला माहितीये का की लग्नाच्या वेळी अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्या घरच्यांसमोर एक अट ठेवली होती. ती पुर्ण झाल्यानंतरच त्यांचे लग्न झाले होते. तुम्हालाही हा किस्सा जाणून घ्यायला आवडेल. सध्या 'कौन बनेगा करोडपती'चं 15 वं पर्व सुरू आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांनी आपल्या लग्नाचा एक किस्सा सांगितला आहे. प्रत्येक लग्न एका विशिष्ट पारंपारिक पद्धतीनं संपन्न होते. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे लग्न हे बंगाली पद्धतीनं झाले होते. गप्पांच्या ओघात त्यांनी ही आठवण सांगितली आहे. ही आठवण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 

वर म्हटल्याप्रमाणे त्या दोघांचे लग्न हे बंगाली पद्धतीनं झाले होते. या परंपरेनुसार, वराला डोक्यावर पांढरा मुकूट घालवा लागतो. ज्याला Topor असं म्हणतात. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी आपण हा मुकूट घालणार नाही असे सांगितले. त्यासाठी त्यांनी आपल्या सासरच्या लोकांना विनंती केली आणि हा मुकूट घालू शकणार नसल्यानं त्यांनी त्यांची माफीही मागितली होती. यावेळी त्यांनी सांगितले की, नवरा नवरीला बंगाली परंपरेनुसार डोक्यावर मुकूट घालणं गरजेचे असते पण मला हे कळतं नाही की नक्की नवरा आणि नवरी हे डोक्यावर मुकूट कशासाठी घालतात. मला मात्र हे मुळीच पसंत नव्हते तेव्हा मी जया यांच्या परिवाराला सांगून टाकेल की मी हा मुकूट घालणार नाही. तेव्हा मग आम्ही अजिबातच तो मुकूट परिधान केला नव्हता.'' असे ते म्हणाले. 

हेही वाचा : साफसफाईचं काम करायची 'ही' अभिनेत्री; शाहरूखसोबत काम अन् नशीब फिरलं, आज 170 कोटींची मालकीण

ते पुढे म्हणाले की, ''मी जया यांच्या परिवाराला सांगितलं की मी तुमची माफी मागतो आहे आणि हे सांगतो आहे की मी तुमची मुलगी जया यांच्याशी लग्न तर करणार आहे परंतु कृपया मला माफ करा परंतु मी ही टोपी घालणार नाही.'' जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या लग्नातले फोटो हे आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यात तुम्ही पाहू शकता जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी डोक्यावर पांढरे मुकूट घातले नव्हते. नुकताच अमिताभ बच्चन यांनी आपला 81 वा वाढदिवस साजरा केला.