मुंबई : सध्या बॉलिवूडशी संबंधीत अनेक लोकांची नावं ड्रग्स आणि अमली पदार्थांच्या प्रकरणाशी जोडली जात आहेत. सेलिब्रिटींना यामुळे समन्स पाठवण्यात येत आहे. ज्यामुळे संपूर्ण बॉलिवूडचे नाव खराब झाले आहे. कंगना राणौतने देखीव याविरोधात युद्ध सुरू केले आहे, तर अनेक स्टार्स बचावासाठी पुढे आले आहेत. अलीकडेच जया बच्चन यांनी संसदेत बॉलिवूडच्या समर्थनार्थ आपलं मत वक्तव्य केले होतं, परंतु त्यानंतर मात्र जया बच्चन जोरदार ट्रोल होऊ लागल्या. एवढच काय तर त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण बच्चन कुटूंब ट्रोल झालं आहे.
मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी राखलेल्या मौनावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खरेतर अमिताभ बच्चन यांचा एका व्यक्तीशी हात मिळवतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. ज्याची तुलना दाऊद इब्राहिमसोबत केली जात आहे.
त्यानंतर आता अभिषेक बच्चनने या फोटोबद्दल आपले वक्तव्य केलं आहे.
सोशल मीडियावर सध्या एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत अमिताभ बच्चन एका व्यक्तीसोबत हात मिळवत आहेत. हा फोटो शेअर करताना अनेकांनी या फोटोत दिसणारी व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम असल्याचे म्हटले आहे. साहजिकच हा फोटो व्हायरल होताच अमिताभ बच्चन यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली.
फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे- 'रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं पर मैं आपका गुलाम हूं।'. अमिताभ बच्चन यांचा सुप्रसिद्ध डायलॉगसंबंधीत हा व्हिडीओ आहे.
आपले वडिल ट्रोल होताना पाहून अभिषेक बच्चन पुढे आला आणि त्याने या फोटोबाबत खुलासा केला. सोशल मीडियावरील एका पोस्टला उत्तर देताना अभिषेक बच्चन म्हणाला की, 'भाऊ, हा फोटो माझे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री अशोक शंकरराव चव्हाण यांचा आहे.'
खरंतर हा फोटो खूप जुना आहे, त्यामुळे त्यात बिग बींसोबत दिसणारी व्यक्ती अस्पष्ट दिसत आहे. यामुळेच लोकांनी या व्यक्तीची तुलना दाऊद इब्राहिमशी केली, ज्यामुळे सुपरहिरोला ट्रोल केले जाऊ लागले.
गेल्या अनेक दिवसांपासून बिग बी कोणत्याही विषयावर बोलत नसल्याची टीकाही होत आहे. त्यामुळे हे फोटो समोर येताच ट्रोलर्सनी पुन्हा एकदा बिग बींना टार्गेट केलं.
मात्र, ज्या व्यक्तीला अभिषेक बच्चनने उत्तर दिले, त्याला सत्य समजल्यानंतर त्याने सोशल मीडियावरून त्याची पोस्ट डिलीट केली. कोरोनाशी लढा जिंकून बिग बी नुकतेच कामावर परतले आहेत, परंतु देशभरात सुरू असलेल्या कोणत्याही मुद्द्यावर त्यांनी आपले मौन सोडलेले नाही. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.