VIDEO : पॅरिस फॅशन वीकमध्ये अमिताभ यांच्या नातीनं केलं डेब्यू

Amitabh Grand Daughter Paris Fashion Week Debute : अमिताभ बच्चन यांच्या नातीनं केलं पॅरिस फॅशन वीकमध्ये डेब्यू... व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल

दिक्षा पाटील | Updated: Oct 2, 2023, 06:39 PM IST
VIDEO : पॅरिस फॅशन वीकमध्ये अमिताभ यांच्या नातीनं केलं डेब्यू title=
(Photo Credit : Social Media)

Amitabh Grand Daughter Paris Fashion Week Debute : बॉलिवूड दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांचं कुटुंब हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता अमिताभ यांची लेक नव्या नवेली नंदा आता चर्चेत आली आहे. त्याचं कारण म्हणजे नव्या नवेली नंदानं पॅरिस फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉककरत मॉडेलिंगमध्ये पदार्पण केलं आहे. नव्याला पाहून तिच्या कुटुंबाला आणि त्याचसोबत तिच्या चाहत्यांना खूप जास्त आनंद झाला आहे. 

नव्याचा मॉडेलिंगमध्ये डेब्यू

नव्यानं पॅरिस फॅशन विकमध्ये डेब्यू किला आहे. याचा व्हिडीओ तिची आई श्वेता बच्चननं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. कोणत्याही आईसाठी एक अभिमानास्पद गोष्ट असते तसंच श्वेताला वाटलं आहे. श्वेतानं पॅरिस फॅशन वीकमधील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी फक्त नव्या नाही तर ऐश्वर्या राय बच्चन देखील दिसली. यंदाच्या पॅरिस फॅशन वीकमध्ये बच्चन कुटुंबातील दोन सदस्या आपल्याला पाहायला मिळाले आहेत. श्वेतानं शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये ती रॅम्प वॉकसाठी तयार होताना दिसली आहे. नव्याला पॅरीस फॅशन वीकमध्ये पाहून सगळ्या बॉलिवूड सेलिब्रिटीजना आनंद झाला आहे. त्यांनी त्यावर कमेंट करत त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नव्यावर श्वेताला आहे गर्व

श्वेतानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नव्या कॉन्फिडेंट दिसत आहे. तर तिची आजी जया बच्चन आणि आई श्वेता तिला सपोर्ट करण्यासाठी पॅरिसला गेले होते. श्वेतानं यावेळी पॅरिसच्या झलक दाखवत काही फोटो शेअर केले आहेत. त्या सगळ्यात जास्त फोटो हे पॅरिसचा आयफेल टॉवर इथे सुरु असलेल्या फॅशन वीकचे आहेत. तर हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत श्वेता म्हणाली की 'या वीकेंडला सगळं पॅरिसला फिरलो, कमीत कमी मी आणि माझी आई. त्याचे खरं कारण हे नव्या आहे, कारण ती संपूर्ण वेळ लॉरियलच्या कामात व्यस्त होती. त्यामुळे मी आणि माझी आई आम्ही पायी चालत आणि खात पित पॅरिस फिरत होतो. खरं सांगू तर फिरण्यापेक्षा आम्ही जास्त खाल्लं. हा फॅशन शो एक अनुभव आहे आणि खूप जवळचा आहे. मी आणि माझी आई आम्ही दोघं तिथे बसून आमची छोट्या मुलीला आनंदानं चालताना पाहत होतो, ते पाहत असताना आम्ही आमचे आनंद अश्रू कसे बसे थांबवले.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'नशेत आहे का?' सैफसोबत डिनर डेटवर गेलेल्या करीनाला लोकांनी केलं ट्रोल

पुढे लेकीविषयी आणखी अनेक गोष्टी सांगत श्वेता म्हणाली, 'मला आजही ती पहिल्यांदा जेव्हा चालली ते आठवतं. जणू काही ती कालची गोष्ट आहे. तिनं यावेळी तिनं लाल ड्रेस परिधान केला होता तर आयफेल टॉवर हा गुलाबी झाला. हे पाहून आम्हाला खूप आनंद झाला होता. खूप भावूक आणि उपाशी होत आम्ही घरी गेलो. मी माझ्या बॅग मध्ये काही M&M ठेवल्या, फॅशन शोमध्ये चॉकलेट खाणं चांगली गोष्ट नाही पण आम्ही खाल्लं. कारण आम्ही त्या लायकिचे आहोत.' यासोबत श्वेतानं डोळा मारत असल्याचं एक इमोजी शेअर केलं आहे.