सुन-सासरे नव्हेतर असं आहे घरात बीग बी आणि ऐश्वर्याचं नात; जया बच्चन यांचा मोठा खुलासा;

बॉलिवूड इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रायला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. 

Updated: Nov 7, 2022, 08:57 PM IST
सुन-सासरे नव्हेतर असं आहे घरात बीग बी आणि ऐश्वर्याचं नात; जया बच्चन यांचा मोठा खुलासा;  title=

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रायला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. ऐश्वर्या राय बच्चनने आपल्या करिअरमध्ये खूप नाव आणि इज्जत कमावली आहे. ऐश्वर्या राय बच्चन परिवाराची लाडकी सून आहे. ऐश्वर्या रायचं लग्न बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अभिनेषेक बच्चनसोबत झालं आहे. 

अभिषेक बच्चनची पत्नी ऐश्वर्या रायने जेव्हा बच्चन परिवारमध्ये पाऊल ठेवलं तेव्हापासूनच ती बच्चन कुटुंबात खूप लाडकी आहे. मात्र अभिषेक बच्चनचे वडिल आणि ऐश्वर्याचे सासरे अमिताभ बच्चन आपली सून ऐश्वर्यासोबत  ऐश्वर्यासोबत असं नातं आहे, जे ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही की, बहुतेक तर सासरे त्यांच्या सुनेसोबत असं नातं नाही ठेवतं. बीग बी आणि ऐश्वर्याच्या या नात्याचा खुलासा खुद्द जया बच्चन यांनी केला आहे.

जया यांनी ऐश्वर्या आणि अमिताभच्या नात्याबद्दल सांगितलं सत्य 
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांच्यात अनोखं नातं असल्याचा खुलासा खुद्द जया बच्चन यांनी केला आहे. जया बच्चन यांनी एकदा कॉफी विथ करण जोहरच्या शोमध्ये याचा खुलासा केला होता की, त्यांचं तिच्या सुनेवर खुप प्रेम आहे.

ऐश्वर्या राय ही आदर्श सून आहे. ऐश्वर्या राय तिच्या पतीचा आधार आहे. त्या ऐश्वर्या रायवर कायम असंच प्रेम करतील. जया बच्चन म्हणाल्या, ''आम्ही एकत्र असताना मी तिला कधीच नाराज झालेले पाहिले नाही, आम्हाला तिचे सगळे गुण आवडतात.

अमिताभ बच्चन यांचं ऐश्वर्यासोबत असं नातं आहे
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन यांना जेव्हा बीग बीं आणि सून ऐश्वर्यासोबतच्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. जया यांना विचारण्यात आलं की, अमिताभ बच्चन त्यांची सून ऐश्वर्याला आदर्श सून मानतात? यावर जया बच्चन यांनी प्रत्युत्तर दिल आणि म्हटलं, जेव्हाही ऐश्वर्या येते तेव्हा अमिताभ बच्चन यांचा चेहरा फुलतो, ऐश्वर्याने मुलगी श्वेता नंदाची उणीव भरून काढली आहे. ते नेहमीच ऐश्वर्यामध्ये श्वेता नंदाला पाहतात. ते कायम ऐश्वर्यासोबत वडील आणि मुलीचं नातं जपतात. अमिताभ बच्चन आपली सून ऐश्वर्या हिला आपली मुलगी मानतात आणि ऐश्वर्याही त्यांना वडिलांचा दर्जा देते.