नोकरीच्या शोधात अमिताभ बच्चन, बायोडाटा सोशल मीडियात व्हायरल

बॉलिवूडचे शहेनशहा अर्थात बिग बी अमिताभ बच्चन यांनी कामासाठी अर्ज केला आहे. आश्चर्य वाटतयं ना? पाहा काय आहे संपूर्ण प्रकार...

Sunil Desale Sunil Desale | Updated: Feb 18, 2018, 01:48 PM IST
नोकरीच्या शोधात अमिताभ बच्चन, बायोडाटा सोशल मीडियात व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूडचे शहेनशहा अर्थात बिग बी अमिताभ बच्चन यांनी कामासाठी अर्ज केला आहे. आश्चर्य वाटतयं ना? पाहा काय आहे संपूर्ण प्रकार...

अमिताभ बच्चन यांचा जॉबसाठी अर्ज

अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत २०० हून अधिक सिनेमांत काम केलं आहे. ७६ वर्षीय अमिताभ यांनी तब्बल ४९ वर्षे सिनेसृष्टीत काम करत आहेत. मात्र, असं काय झालं की बिग बी अमिताभ बच्चन यांना जॉबसाठी अर्ज करावा लागला आहे.

बायोडाटा सोशल मीडियात केला शेअर

शनिवारी रात्री अमिताभ बच्चन यांनी आपला बायोडाटा सोशल मीडियात शेअर केला. त्यांची पोस्ट व्हायरल होण्यात जराही वेळ लागला नाही. अमिताभ यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रातील आर्टिकलचा फोटो ट्विट करत सोशल मीडियावरुन कामासाठी अर्ज केला आहे. 

असा आहे अमिताभ यांचा बायोडाटा 

  • अमिताभ बच्चन 

  • जन्म : ११.१०.१९४२

  • वय : ७६ वर्षे 

  • अनुभव : ४९ वर्ष सिनेमांत केल्याचा अनुभव 

  • जवळपास २०० सिनेमांत अभिनय 

  • भाषा : हिंदी, इंग्रजी, पंबाजी, बंगाली

  • उंची : ६'२

  • तुम्हाला कधीही उंचीची समस्या निर्माण होणार नाही.

अमिताभ बच्चन यांनी पोस्ट केलेला अर्ज खूपच इंट्रेस्टिंग आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रात म्हटलं आहे की, अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफ यांची उंची बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि आमिर खानपेक्षा जास्त आहे. यामुळेच अमिताभ यांनी दीपिका-कतरिनासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करत लिहीलं की, माझ्यासोबत काम करताना दीपिका-कॅट यांना उंचीच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही.

आपल्या आगामी '१०२ नॉट आऊट' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये अमिताभ बच्चन सध्या व्यस्त आहेत. या सिनेमाचा टिझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. 

या सिनेमात अभिनेता अमिताभ बच्चन आणि ऋषि कपूर यांची जोडी पहायला मिळणार आहे.