Amitabh Bachchan यांच्याकडून सलमानला मोलाचा सल्ला, ऐकताच भाईजानची 'बोलती बंद'

बॉलीवूड अभिनेता सलमान खान डिसेंबरमध्ये द-बँग: द टूर रीलोडेडसाठी रियादला गेला होता.

Updated: Jan 14, 2022, 01:16 PM IST
Amitabh Bachchan यांच्याकडून सलमानला मोलाचा सल्ला, ऐकताच भाईजानची 'बोलती बंद' title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खान डिसेंबरमध्ये द-बँग: द टूर रीलोडेडसाठी रियादला गेला होता. जिथे त्याच्यासोबत अनेक सेलेब्स या टूरचा भाग बनले होते. या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अभिनेता मनीष पॉलही सलमान खानसोबत या कार्यक्रमासाठी गेला होता. मनीषने त्याच्या यूट्यूब चॅनलवर या दौऱ्या दरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने चाहत्यांना बॅकस्टेजपासून ते कार्यक्रमातील धमाल-मस्तीच्या सगळ्या झलक दाखवल्या आहे.

या कार्यक्रमात सलमान खानसोबत प्रभुदेवा, शिल्पा शेट्टी, आयुष शर्मा आणि सई मांजरेकर यांनी परफॉर्म केले. यासोबतच सुनील ग्रोव्हरही या कार्यक्रमाचा एक भाग बनला होता. मनीषने त्याच्या व्हिडिओमध्ये सुनील ग्रोव्हरच्या स्किटचा एक भाग देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये सलमान खान लाजताना दिसत आहे.

सुनील ग्रोवर बनला अमिताभ बच्चन
व्हिडिओमध्ये मनीष पॉल अमिताभ बच्चन यांना कॉल करतो. त्यानंतर सुनील ग्रोव्हर बिग बींच्या लूकमध्ये येतो आणि सलमान खानसोबत मस्ती करु लागतो. कौन बनेगा करोडपतीच्या स्टाईलमध्ये तो सलमान खानला म्हणतो की, काय होतं तुला लग्नाच्या नाव घेतल्यावर? करून घे. यानंतर सलमान खान लाजू लागतो. व्हिडिओच्या शेवटी मनीष पॉल म्हणतो की, द-बँग टूर खूप मजेदार होती. रियाधमधील लोकांचं खूप प्रेम मिळालं.

या कार्यक्रमात सलमान खानने मैने प्यार किया, हम आपके है कौन, मुझसे शादी करोगे आणि किक या गाण्यांवर परफॉर्म केले. सलमान खानचा परफॉर्मन्स पाहून चाहते वेडे झाले. त्याच्या या कामगिरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सध्या सलमान खान रिअॅलिटी शो बिग बॉस 15 होस्ट करताना दिसत आहे. त्याचा शेवटचा चित्रपट २६ नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत आयुष शर्मा मुख्य भूमिकेत दिसला होता.