१० अरबची संपत्ती, १ अरब कर्ज, अमिताभच्या १५ खात्यांमध्ये ४७ कोटी

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांच्या मालकीच्या 10 अब्ज रुपयांची संपत्ती आहे. 

Updated: Mar 10, 2018, 04:09 PM IST
१० अरबची संपत्ती, १ अरब कर्ज, अमिताभच्या १५ खात्यांमध्ये ४७ कोटी  title=

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांच्या मालकीच्या 10 अब्ज रुपयांची संपत्ती आहे.

राज्यसभेच्या खासदार जया बच्चन यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात हे उघड केले आहे. जया बच्चन शुक्रवारी (9 मार्च) लखनऊमध्ये समाजवादी पक्षाच्या उमेदवार म्हणून राज्यसभा निवडणुकीसाठी फॉर्म भरला. 

प्रतिज्ञापत्रात दिलेल्या कागदपत्रांनुसार, जया आणि अमिताभ यांच्याकडे १०.०१ अब्ज रूपये चल संपत्ती आहे. 

एका खात्यात ६ कोटी 

 शपथपत्रानुसार, जया आणि अमिताभ यांचे लंडन, दुबई आणि पॅरिसमधील बँकेत खाती आहेत. देशात आणि परदेशात बच्चन कुटुंबाचे १९ बँक खाती आहेत. 
  
 जया बच्चन यांच्या नावावर चार खाती आहेत. या खात्यांमधील 6.84 कोटी जमा आहेत. देशाबाहेर जया बच्चनचे एक खाते असून त्यामध्ये 6 कोटी 59 पैसे आहेत. 

दिल्ली-मुंबईबाहेर पैसा

अमिताभ बच्चन यांच्या १५ बँक खात्यांमध्ये मिळून ४७.४७ कोटी रुपयांच्या  ठेवी आहेत.

बिग बीचा पैसा आणि एफडी दिल्लीमुंबई व्यतिरिक्त बॅंक ऑफ इंडियाच्या पॅरीस शाखेत, बँक ऑफ इंडियाची लंडन शाखेत आणि बीएनपी फ्रान्समध्ये जमा आहे.