कपिल शर्माच्या पहिल्या एपिसोडमध्ये हा अभिनेता लावणार हजेरी

कॉमेडी किंग कपिल शर्मा लवकरच पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येतोय. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 10, 2018, 04:57 PM IST
कपिल शर्माच्या पहिल्या एपिसोडमध्ये हा अभिनेता लावणार हजेरी title=

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा लवकरच पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येतोय. 

कपिलचं कमबॅक

कपिलचे फॅन्स त्याच्या कमबॅकची वाट पाहत आहेत. शोचा प्रोमो रिलीज झाला आहे. कपिल एका वेगळ्या अंदाजात पुन्हा कमबॅक करतोय. कपिलचा हा नवा शो फॅमिली टाईम विद कपिल शर्मा हा एक गेम शो असणार आहे. सोबतच यामध्ये धमाल, मस्ती पाहायला मिळणार आहे. या शोकडून कपिलला खूप आशा आहे. या शोमध्ये सेलिब्रिटी नाही येणार असं बोललं जात होतं पण हे चुकीचं ठरलंय. 

कोण आहे पहिला सेलिब्रिटी

या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेता अजय देवगन हजेरी लावणार आहे. रेड या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अजय पहिल्या एपिसोडमध्ये उपस्थित राहणार आहे. अजय सोबतच इलियाना डिक्रुज देखील या सिनेमात काम करतेय. त्यामुळे ती देखील या शोमध्ये येणार आहे.

कपिलने घेतला धडा

अजयने कपिलसोबत एक प्रोमो देखील शूट केला आहे. मागच्या शोपासून कपिल खूप काही शिकलाय. मागचा शो बंद झाल्याने त्याला चांगलाच धक्का बसला होता. त्यामुऴे आता कपिल काय नवीन घेऊन येतो हे पाहावं लागेल. 25 मार्चला हा शो सुरु होऊ शकतो.