मुंबई : क्योंकि सांस भी कभी बहू थी, दिल दे के देखो या टिव्ही मालिकेतील अभिनेता अमित टंडनची पत्नी रुबी टंडन तुरुंगात असल्याचे वृत्त आहे.
अमितची बायको रुबी त्वचारोग तज्ञ आहे. एका प्रकरणात तिला दुबई पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्यात. मीडिया रिपोर्टनुसार, सरकारी अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी तिच्यावर ही कारवाई करण्यात आलीये. माहितीनुसार, तुरुंगात असलेल्या रुबीला जामीनही नामंजूर करण्यात आलाय.
अमित टंडन इंडियन आयडॉलच्या पहिल्या सीझनमधून चर्चेत आला होता. त्यानंतर ये है मोहब्बतें, क्योकि सांस भी कभी बहू थी, अदालत सीझन २, कैसा ये प्यार है, जरा नचके दिखा यासारख्या टीव्ही शोज तसेच मालिकांमधून त्याने काम केले होते. १० वर्षांपूर्वी अमित आणि रुबी विवाहबद्ध झाले. त्यांना ७ वर्षांची मुलगीही आहे.
Start your day on a positive note...with a selfie ;) pic.twitter.com/UULvjJI7Lt
— Amit Tandon (@amit_tandon0411) September 22, 2015