ढिंच्यॅक पूजा आता तुम्हाला दिसणार 'इथे'

सुरूवातीला अशी बातमी होती की, ढिंच्यॅक पूजा बिग बॉस ११ मध्ये पाहुणी कलाकारच्या रूपात दिसणार आहे. मात्र त्यानंतर अशी ही माहिती आली की ही बातमी चुकीची आहे. पण....

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 11, 2017, 03:59 PM IST
ढिंच्यॅक पूजा आता तुम्हाला दिसणार 'इथे' title=

मुंबई : सुरूवातीला अशी बातमी होती की, ढिंच्यॅक पूजा बिग बॉस ११ मध्ये पाहुणी कलाकारच्या रूपात दिसणार आहे. मात्र त्यानंतर अशी ही माहिती आली की ही बातमी चुकीची आहे. पण....

आता असू ऐकं येतंय की ढिंच्यॅक पूजा 'बिग बॉस'च्या घरात फायनली येणार आहे. एवढंच नाही तर अशी देखील माहिती आहे की, 'बिग बॉस'च्या घरात पाहुणी कलाकार येण्यासाठी तिला मोठी रक्कम देण्यात येणार आहे. सुत्रांची अशी देखील माहिती आहे की, 'बिग बॉस' शी तिच्या सर्व डिल साइन झाल्या आहेत. पूजा युट्यूबवर आपल्या अतरंगी गाणी आणि व्हिडिओसाठी लोकप्रिय आहे. एवढंच नाही तर तिच्या या चटपटीत गाण्यामुळे आतापर्यंत तिने करोडो रुपये कमावले आहेत. 

अशी देखील माहिती आहे की, 'बिग बॉस' च्या घरी जाण्या अगोदर पूजाने काही नवीन व्हिडिओ देखील बनवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना देखील पूर्ण विश्वास आहे की, पूजा बिग बॉसच्या घरी देखील काही गाणी प्रेक्षकांना ऐकवेल. त्यामुळे आता तिच्या गाण्यांना प्रेक्षक झेलतात की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे.  

युट्यूब अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर 'बापू दे दे थोडा कॅश' हा पूजाचा पहिलाच व्हिडिओ आहे. अर्थात त्यालाही २४ तासांच्या आत ६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या अतरंगी गायिकेची लोकप्रियता वाढता वाढता वाढे अशी आहे. पूजाच्या अशा अनेक गाण्यांना सोशल मीडियावर पसंती मिळाली. आणि त्यामुळेच ती चर्चेत राहिली.