Ameesha Patel and Vikram Bhatt: अमिषा पटेल सध्या चर्चेत आहे कारण तिचा 22 वर्षे जूना हिंदी चित्रपट 'गदर 2' हा चित्रपट नव्यानं प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यामुळे सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सध्या तिच्या एका अफेअरची सर्वत्र चर्चा रंगली होती आणि ती म्हणजे दिग्दर्शक-निर्माता विक्रम भट्टसोबतच्या प्रेमसंबंधाची. त्यावरून तिला तेव्हा खूप प्रसिद्धी मिळली होती. त्याची चर्चा अजूनही चर्चा रंगताना दिसते. सध्या पुन्हा एकदा विक्रम भट्ट आणि अमिषा पटेलच्या त्या जुन्या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. आपल्या त्या रिलेशनशिपमुळे आपलं संपुर्ण करिअर उद्धवस्त झालं हे अमिषा पटेल कबूल करताना दिसते. त्यातून यावर तिनं विक्रम भट्टच्या नात्यावर तिनं अप्रत्यक्षपणे भाष्य केले आहे. या लेखातून पाहुया की नक्की ती यावर काय म्हणाली आहे?
नुकतीच तिनं बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीतून यावर भाष्य केले आहे. ती म्हणाली की, या इंडस्ट्रीमध्ये प्रामाणिकपणा कुठेही नाही. मी मात्र त्याच व्यक्तीला माझ्या आयुष्यात जागा देते. मीही तिचीच एक व्यक्ती आहे आणि मला हेच वाटतंय की कदाचित ही गोष्ट माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. हो, माझ्या आयुष्यात त्या दोन रिलेशनशिप्समुळे मला खूप त्रास झाला. त्यातून त्यांच्याबद्दल सार्वजनिकरीत्याही खूप चर्चा झाली. याच दोन रिलेशनशिपमध्ये फक्त मी होते. ज्यामुळे मला माझ्या करिअरवरही फार परिणाम झाला. खासकरून 12-13 वर्षे तरी मी यातून बाहेर पडू शकले नव्हते. मला माझ्या आयुष्यात कोणी नको. मला फक्त शांत शांतता हवी आहे.
त्यामुळे तिनं आपल्या करिअरवरही यावेळी भाष्य केले आहे. त्यात ती म्हणाली की, तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा आजूबाजूच्या माणसांना कायमच सिंगल स्टेटस असणाऱ्या मुलीबद्दल आकर्षण वाटतं. त्याचसोबतच या गोष्टीचे आकर्षण हे प्रेक्षकांनाही वाटतं असते. अनेकांना असं वाटतं की तुम्ही जर का कोणाला या इंडस्ट्रीत कोणत्या तरी सुपरस्टारला डेट करतायत तर ते तुमच्या करिअरला फार लाभदायी ठरतं. त्याशिवाय कुणी कोणाला स्विकारत नाही. जर एखादी हिरोईन एका हिरोला डेट करत असेल तर ती त्याच्यासोबत काम करू शकतं. पण मी तशी नाही. तुम्हाला या सर्व गोष्टींचा त्रास होतो परंतु मला त्यातून शकेल आहे.'' असं ती यावेळी म्हणाली.
हेही वाचा - ''शेतकरी नवरा कराल का?''; अभिनेत्री जुई गडकरीचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान
सध्या अमिषा पटेलच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. सोबतच आता तिच्या येणाऱ्या चित्रपटाचीही प्रेक्षकांना उत्सुकता रंगलेली दिसते आहे.