''शेतकरी नवरा कराल का?''; अभिनेत्री जुई गडकरीचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jui Gadkari on Shetkari Navra: जुई गडकरी आपल्या हटके अभिनयासाठी ओळखली जाते. त्याचसोबत ती आपल्या आगळ्यावेगळ्या स्टाईलसाठीही ओळखली जाते. सध्या तिची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. शेतकरी नवरा हवा यावर तिनं हे हटके उत्तर दिलं आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 4, 2023, 04:49 PM IST
''शेतकरी नवरा कराल का?''; अभिनेत्री जुई गडकरीचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान  title=
July 4, 2023 | jui gadkari answers on what if she would like to marry a farmer latest entertainment news in marathi

Jui Gadkari on Shetkari Navra: हल्लीचे अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या रिलेशनशिप स्टेटसबद्दलही फार मोकळेपणाने बोलताना दिसतात. हल्ली सेलिब्रेटी हे सोशल मीडियावर मोकळेपणानं बोलताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपबद्दल अनेकदा चर्चाही होताना दिसते. त्यांनी जरा कोणासोबतही फोटो काढला तरी त्यांच्या लिंकअपला लागलीच सुरूवात होते. सध्या अशाच एका अभिनेत्रीची चर्चा आहे. हल्ली मुली या शेतकरी नवरा करण्याकडेही भर देतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. अभिनेत्री जुई गडकरी हिनं आपल्याला विचारेलल्या अशाच एका प्रश्नावर उत्तर दिलं आहे. तिनं इन्टाग्रामवरून हे उत्तर दिलेलं आहे. सध्या तिच्या या उत्तराची सर्वत्र चर्चा रंगली आहे. शेतकऱ्याची लग्न करणार का यावर तिला प्रश्न विचारण्यात आल्यावर पाहा तिनं नक्की काय उत्तर दिलं आहे. 

जुई गडकरी ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. आपले नानाविध पोस्टनं ती चाहत्यांना कायमच घायाळ करते. सध्या तिनं इन्टाग्राम स्टोरीवरून आपलं असंच एक प्रश्नोत्तराचे सेशन घेतले होते. त्यामध्ये तिला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले होते. त्यातील एका प्रश्नावर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या होत्या. यावेळी सेशनमध्ये तिला एका चाहत्यानं प्रश्न विचारला की, ''जेव्हा तुम्ही लग्न करण्याचा विचार कराल तेव्हा तुमची पसंती एखादा शेतकरी असू शकतो का?'' परंतु तिनं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत. 

या प्रश्नाला उत्तर देत ती म्हणाली की, ''नक्कीच!! कारण आम्हीपण शेतकरी आहोत.'' सध्या तिच्या या उत्तरानं सर्वांचीच मनं जिंकून घेतली आहेत. 'पुढचं पाऊल' ही जुई गडकरीची सर्वात गाजलेली मालिका होती. त्यानंतर तिच्या अनेक लोकप्रिय मालिका या गाजल्या आहेत. त्याचसोबत 'तुजवीण सख्या रे', 'सरस्वती', 'बिग बॉस' अशा मालिकांतूनही ती घराघरात पोहचली आहे. त्याचसोबत सध्या तिची 'ठरलं तर मग' ही मालिका जोरदार सुरू आहे. जुईच्या घरातही अनेक कलाकार आहेत. तिचे वडीलदेखील लेखक आहेत. सोबतच लेखक राम गणेश गडकरींच्या परिवारातील ती आहे. 

हेही वाचा - जगातील सर्वात महागडी गायिका; Concert च्या एका तिकिटाची किंमत तुमच्या पगारापेक्षाही जास्त

जुई आपल्या हटके स्टाईलनं आणि तिच्या अभिनयानं चाहत्यांना कायमच घायाळ करताना दिसते. तिच्या अनेक फोटोंना लाईक्सही येताना दिसतात. त्याचसोबत तिचे व्हिडीओही चांगलेच व्हायरल होतात. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जुई अनेकदा तिचे साडीतले ट्रेडिशनल फोटो व्हायरल करताना दिसते. तिच्या या पारंपारिक लुकला कायमच लाईक्स मिळताना दिसतात.