प्रेमासाठी वाट्टेल ते... Allu Arjun नं 'या' गोष्टीचा त्याग करत केली बायकोची इच्छा पुर्ण, पाहा Video

आता अल्लूचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Updated: Sep 30, 2022, 08:13 PM IST
प्रेमासाठी वाट्टेल ते... Allu Arjun नं 'या' गोष्टीचा त्याग करत केली बायकोची इच्छा पुर्ण, पाहा Video title=

Pushpa Actor visits Golden Temple: पुष्पा या चित्रपटानं अल्लू अर्जूनला चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली. या चित्रपटापेक्षा अल्लू अर्जूनच्या स्टाईलची आणि त्याच्या अभिनयाची चर्चा झाली. आता अल्लूचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे जो पाहून तुम्ही परत एकदा अल्लू अर्जूनचे चाहते व्हाल यात शंका नाही. (allu arjun visits golden temple wife his family for his wifes birthday video goes viral)

अल्लू अर्जुनने 29 सप्टेंबर रोजी आपल्या पत्नीचा स्नेहा रेड्डीचा वाढदिवस उत्साहात साजरा केला ज्याचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या खास दिवशी अल्लूनं अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचं दर्शन घेतलं ज्याच्या व्हिडीओची लिंक स्वतः अल्लूनं इन्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. 

अमृतसरपासून वाघा बॉर्डर केवळ 40 ते 45 किलोमीटर अंतरावर असल्याने अल्लू अर्जूनच्या परिवारानं येथेसुद्धा भेट दिली. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसोबतचा फोटो शेअर करत अल्लू अर्जुनने शेअर केली. यावेळी अल्लूला पाहून सगळीकडूनच चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली.

अल्लू अर्जुन या खास दिवशी क्लासिक ब्लॅक अँड व्हाइट लूकमध्ये दिसला आणि त्याने आपले केस पोनीटेलमध्ये बांधले होते. अल्लू निळ्या कुर्ता पायजमामध्ये खूपच हॅण्डसम दिसत होता तर पत्नी स्नेहानं सलवार सूट घातला होता. 'पुष्पा: द रुल' या त्याच्या आगामी चित्रपटातून अल्लू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सुकुमारन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल दिसणार आहेत. न्यूयॉर्क टूरवर एका दिग्दर्शक-निर्मात्याने अल्लूला हॉलिवूड चित्रपटाची ऑफर दिली होती. मात्र याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत माहिती नाही.