मुंबई : दाक्षिणात्य चित्रपट विविधभाषेत प्रदर्शित झाले आणि प्रेक्षकांवर या चित्रपटाची कमाल भुरळ पडली. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या आणि गाजलेल्या 'पुष्पा: द राइज' (Pushpa: The Rise)या चित्रपटाला मिळालेलं यश पाहून याचा सहज अंदाज लावता येतो.
अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun)याची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटानं जागतिक पातळीवर दमदार कमाई केली.
हिंदी भाषिक प्रेक्षकांना 'पुष्पा' भलताच पसंत पडला. कारण होतं ते म्हणजे यातील डायलॉग आणि 'पुष्पा'चा, अर्थात अभिनेता अल्लू अर्जुनचा आवाज.
मराठमोळा अभिनेता, श्रेयस तळपदे यानं चित्रपटात पडद्यामागून 'पुष्पा' साकारला आहे. अर्थात त्याला आवाज दिला आहे. (shreyas talpade)
हल्ली तर प्रत्येकाच्याच तोंडी या चित्रपटातले डायलॉग आणि श्रेयसचं नाव पाहायला मिळत आहेत. 'फायर है मै...' असं म्हणत प्रत्येकजण 'पुष्पा'चीच नक्कल करताना दिसत आहे.
इथं हा चित्रपट कोट्यवधींची कमाई करत गेला आणि तिथं या निमित्तानं श्रेयस मालामाल झाला. त्याच्या लोकप्रियतेत दुपटीनं भर पडली.
अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन आणि ध्वनिमुद्रण, व्हॉईसओवर आर्टिस्ट अशा विविध क्षेत्रांमध्ये श्रेयसनं उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
गॉडफादरशिवाय मिळवली ओळख...
मीना टी आणि जयश्री टी यांचा भाऊ म्हणजे श्रेयसचे वडील. मुंबईत श्रेयसचा जन्म झाला होता. त्यानं या कलाजगतात जे स्थान मिळवलं ते सर्वकाही फक्त मेहनतीच्या बळावर.
आतापर्यंतच्या कारकिर्दीत मी कधी करण जोहर किंवा यशराज फिल्म्स या निर्मिती संस्थांअंतर्गत काम केलं नाही, पण याचा अर्थ असा नाही की मी चांगला अभिनेता नाही, असं तो एका मुलाखतीत म्हणाला होता.
श्रेयसनं असेही दिवस पाहिले जेव्हा त्याच्याकडे साधं सँडविच विकत घेण्यासाठीचेही पैसे नव्हते. आज हाच श्रेयस कोट्यवधींची कमाई करताना दिसत आहे.
एका मुलाखतीत त्यानंच हा खुलासा केला होता. कधीकाळी आपल्याकडे भाडं भरण्यासाठी, सँडविच घेण्यासाठी इतकंच काय तर स्टुडिओपर्यंत बसनं जाण्याचेही पैसे नव्हते, असं तो म्हणाला होता.
सूत्रांच्या माहितीनुसार श्रेयस एका चित्रपटासाठी 2-3 कोटी रुपये इतकं मानधन घेतो.
मोठ्या निर्मितीसंस्थेसोबत नाही, तरीही श्रेयसनं आजवर बऱ्याच मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे.
एक कलाकार म्हणून प्रत्येक टप्प्यावर श्रेयस आपल्या कारकिर्दीला नव्यानं आकार देताना दिसला. 'द लायन किंग' या चित्रपटाच्या हिंदी वर्जनसाठी त्यानं Billy Eichner या हॉलिवूड कलाकाराच्या पात्राला आवाज दिला होता.
तुम्हाला श्रेयसचं कोणतं रुप भावलं, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.