Allu Arjun Megastar Family : अभिनेता अल्लू अर्जुनची क्रेझ फक्त दाक्षिणेत नाही तर संपूर्ण भारतात आहेत. ‘पुष्पा 2’ ला मिळालेल्या लोकप्रियतेनंतर सगळ्यांच्या तोंडातच त्याचंच नाव आहे. संध्या थिएटर्समध्ये झालेल्या गोंधळात एक महिलाचं निधनं झालं. या प्रकरणात शुक्रवारी अल्लू अर्जुनला अटक केली. दरम्यान, आज सकाळी त्याची सुटका झाली. तेव्हा पासून तो चर्चेत होता. अल्लू अर्जुनच्या चित्रपटांविषयी आणि या संपूर्ण प्रकरणाविषयी सगळ्यांना माहित आहे पण त्याच्या कुटुंबाविषयी तुम्हाला माहिती आहे का?
अल्लू अर्जुनच्या आजोबांचं नाव अल्लू रामलिंगय्या आहे. ते 70-80 च्या दशकात तेलगू इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय अभिनेते होते. त्यांनी कनका रत्नम यांच्याशी लग्न केलं. त्यांना दोन मुलं झाली असून मुलाचं नावं अल्लू अरविंद आणि मुलीचं नाव सुरेखा होतं. अल्लू रामलिंगय्या यांना पद्मश्री आणि रघुपति वेंकैया या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
अल्लू रामलिंगय्या यांचा मुलगा अल्लू अरविंद हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय निर्माता आणि डिस्ट्रीब्यूटर आहेत. त्यांनी अल्लू अरविंद यांचं लग्न निर्मला यांच्याशी करून दिलं. त्यांना तीन मुलं झाली अल्लू अर्जुन, अल्लू वेंकटेश आणि अल्लू सिरीष. अल्लू अर्जुनचा मोठा भाऊ अल्लू वेंकटेश हा कधी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अभिनेता होता. आता तो बिझनेसमॅन आहे आणि त्याचा छोटा भाऊ अल्लू सिरीष हा तेलगू चित्रपटसृष्टीत अभिनेता आहे.
अल्लू रामलिंगय्या यांनी त्यांची लेक सुरेखा यांचं लग्न चिरंजीवीशी केलं. चिरंजीवी हे फक्त एक दिग्गज अभिनेता नाही तर राजकारणात देखील सक्रिय आहेत. अल्लू अर्जुनचा आत्ये भाऊ राम चरण हा देखील त्याच्या प्रमाणेच लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता आहे. चिरंजीवी यांची लेक सुष्मिता आणि श्रीजा या देखील इंडस्ट्रीशी जोडलेल्या आहेत. राम चरण आणि अल्लू अर्जुन हे फक्त चुलत भाऊ नाही तर चांगले मित्र देखील आहेत. दोघं अनेकदा फिरायला एकत्र झाल्याचे पाहायला मिळाले.
चिरंजीवी यांचे भाऊ पवन कल्याण हे स्वत: एक अभिनेता आणि आंध्र प्रदेशचे उप मुख्यमंत्री आहेत. पवन कल्याण या नात्यानं अल्लू अर्जुनचे मामा लागतात. त्याशिवाय नागेंद्र बाबूचा मुलगा वरुण तेज आणि निहारिका कोनिडेला आणि चिरंजीवीची बहीण विजया दुर्गाचा मुलगा धर्म तेज आणि वैष्णव तेज देखील अल्लू अर्जुनचे चुलत भावंडं आहेत. अल्लू आणि कोनिडेल या कुटुंबाचं असलेल्या या नात्यामुळे त्यांच्यात खूप चांगलं बॉन्ड आहे. दोन्ही कुटुंबाचे खूप चांगले संबंध आहेत.
हेही वाचा : अल्लू अर्जुननं तुरुंगात कशी काढली रात्र?
अल्लू अर्जुनचं लग्न 2011 मध्ये स्नेहा रेड्डीशी झालं. स्नेहा रेड्डी ही एका बिझनेसमॅन कुटुंबातून आहे. त्या दोघांना दोन मुलं असून मुलाचं नाव अयान आणि लेकीचं नाव अरहा आहे.