मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरच्या रिलेशनशिपच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत असतात. चाहत्यांना देखील त्यांची जोडी फार आवडते. दोघांनी एका कार्यक्रमादरम्यान आपल्या प्रेमाची कबुली देखील दिली. एवढंच नाही तर त्यांच्या लग्नाच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. पण काही प्रोजेक्ट असल्यामुळे दोघे इतक्यात लग्न करणार नाहीत असं सूत्रांनी सांगितलं आहे. आलिया लवकरचं 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.
रिपोर्टनुसार, सिनेमा प्रदर्शित होण्याआधी आलियाला तिच्या कुटुंबासोबत आणि बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा पाहायचा होता. पण सिनेमाचे दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांनी आलियाला यासाठी ठाम नकार दिला.
कारण संजय लीला भन्साळी त्यांच्या सिनेमांबाबत प्री-स्क्रीनिंग नियम पाळत नाहीत. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी ते प्री-स्क्रीनिंग ठेवत नाहीत. रणबीर कपूर आणि सोनम कपूर स्टारर 'सावरिया'च्या वेळी दिग्दर्शकाने हाच नियम पाळला होता. अशा स्थितीत 'गंगूबाई काठियावाडी'साठी ते हा नियम कसा मोडणार? त्यामुळे त्यांनी सिनेमा पाहाण्यास आलियाला नकार दिला.
बॉलीवूड हंगामाच्या एका सूत्राने सांगितले की, 'आलिया 'गंगूबाई काठियावाडी'मधील तिच्या कामामुळे खूप खूश आहे. ती तिच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर आली आहे. 'गंगूबाई काठियावाडी' 18 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.