आलियाचं रणबीरवरील प्रेम पुन्हा एकदा जगासमोर

आलिया-रणबीर पुन्हा एकत्र 

Updated: Mar 5, 2021, 03:42 PM IST
आलियाचं रणबीरवरील प्रेम पुन्हा एकदा जगासमोर  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट  बर्‍याचदा सोशल मीडियावर काहीतरी काही ना काहीतरी पोस्ट करत राहते. प्रत्येकजण त्यांच्या पोस्टवर लक्ष ठेवून आहे. आता तिने पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. गुरुवारी आलिया भट्टने तिच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या सेटमधील फोटो शेअर केले आहेत.

आलियाने शेअर केले फोटो

 या फोटोंमध्ये ती तिचा प्रियकर आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबत दिसली. आलियाने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आलिया भट, रणबीर आणि 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्यासह काली देवीच्या विशाल मूर्तीच्या समोर उभे दिसत आहेत. (आलिया भट्ट खऱ्या अर्थाने रणबीर कपूरची सपोर्ट सिस्टम) 

 

आलिया ने दिले असे कॅप्शन

आलिया भट हिने इंन्स्टाग्रामवर या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'या प्रवासात असणं हा एक आशीर्वाद आहे. ही फक्त सुरूवात आहे.

ब्रह्मास्त्रचे स्टारकास्ट

'ब्रह्मास्त्र'मध्ये मौनी रॉयसह बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि तेलगू सुपरस्टार नागार्जुनही आहेत. नागार्जुनने नुकतेच ट्विटरवर जाहीर केले होते की, त्याने सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

या सिनेमामध्ये दिसेल आलिया

आलिया भट आणि रणबीर कपूर दोघेही बर्‍याचदा एकत्र दिसतात. मग ते कौटुंबिक कार्य असो किंवा इतर काही विशेष कार्यक्रम. दोघेही नेहमीच एकमेकांना साथ देताना दिसतात. त्याचवेळी आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोललो, तर 'ब्रह्मास्त्र' शिवाय ती 'गंगूबाई काठियावाडी' मध्येही दिसणार आहे. त्यांच्या चित्रपटाचा ट्रेलरही समोर आला आहे, जो लोकांना खूप आवडला आहे. संजयलीला भन्साली यांच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार केला जात आहे. या चित्रपटात आलिया एका वेगळ्याच रूपात दिसली आहे.