Alia Bhatt Raha Kapoor Breastfeeding: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे राहा कपूरची. आलिया आणि रणबीरची राहा ही आता 6 महिन्यांची झाली आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Alia Bhatt and Ranbir Kapoor) यांनी एकमेकांना 6-7 वर्ष डेट केल्यानंतर मागच्या वर्षी 14 एप्रिल रोजी लग्न केले आणि मागच्याच वर्षी त्यांच्या घरी राहा नावाच्या एका गोड पाहुणीचे आगमनही झाले. म्हणता म्हणता राहा सहा महिन्यांची झाली आहे. आपल्या तान्ह्या राहाच्या सवयींबद्दल बोलताना आलियानं नुकताच खुलासा केला आहे.
आलिया आणि रणबीरच्या लेकीचे फोटो हे अनेकदा व्हायरल होतात त्यातून मध्यंतरी अनेक खोटे फोटोही राहाचे आणि आलियाचे व्हायरल झाले होते. अद्याप आलिया-रणबीरनं (Alia Bhatt Daughter) आपल्या लेकीचा फोटो दाखवलेला नाही. (Alia Bhatt shares her experience while breastfeeding her daughter raha kapoor)
'हार्पर्स बाजार अरेबिया'ला दिलेल्या एका मुलाखतीत आलियानं राहाला स्तनपान करतानाचा अनुभव शेअर केला आहे. त्यामुळे राहाच्या एका नव्या सवयींबद्दल आलियानं खुलासा केला आहे. लहान मुलांच्या प्रत्येक नव्या हालचाली या त्यांच्या पालकांना त्यांच्या प्रेमात पाडत असतात. नवजात बालकांच्या हालचाली तर आपल्यालाही त्यांच्या प्रेमात पडतात. इतके ते निरागस आणि लाघवी असतात. सध्या आलियाही याच अनुभवांतून जाते आहे तेव्हा अशा एका गोड अनुभवाबद्दल तिनं खुलास केला आहे. ज्याला आलिया रोमॅण्टिक मुमेंट (Romantic Moment) असं म्हणते. सोबतच स्तनपान करताना तिला आलेल्या वेगळ्या अनुभवाबद्दलही ती सांगते आहे.
हेही वाचा - AI मुळे ऑस्कर विजेता संगीतकार A.R.Rahman चिंतेत; वाचा नक्की असं घडलंय तरी काय?
आपल्या लेकीला स्तनपान करताना आलियाला एक वेगळाच अनुभव आला आहे. या मुलाखतीतून त्यानं सांगितले आहे की, माझी मुलगी माझ्या चेहऱ्याला स्पर्श करू लागली आहे. ही माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट आहे जी मागच्या आठवड्यात माझ्यासोबत झाली आहे. मी तिला स्तनपान करतेय. आता मला तिचा स्पर्श आणि भावना कळतायत तेव्हा ती फक्त एक किंवा दोन मिनिटं घेते आणि माझ्याकडे (Breastfeeding Alia Bhatt) पाहते आणि माझ्या चेहऱ्याला स्पर्श करते. ही आमच्या दोघांमधील एक रोमॅण्टिक मुमेंट आहे आणि ही माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट आहे.
याच मुलाखतीतून बोलताना आलिया म्हणते की, माझ्या मुलीसोबतचा प्रत्येक दिवस हा नवा असतो. त्याबद्दल मला रोज काहीतरी नवं जाणवतं, कळून येतं. मी या सर्व प्रक्रियेत एक गोष्ट शिकली आणि ती म्हणजे संयम. मी अशी व्यक्ती नव्हते. परंतु आई होण्याचे वास्तव तुम्हाला संयमाची जाणीव करून देते. हा एक वेगळा अनुभव आहे. पण यानं तुम्हाला वेगळंच बळ मिळते.