मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 'गंगूबाई काठियावाडी'चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर आलिया भट्टच्या नवीन सिनेमाचा बोलबाला सुरू आहे. चाहत्यांना अभिनेत्रीची बिंधास्त स्टाईल खूप आवडली आहे. या चित्रपटातील व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तिने खूप मेहनत घेतल्याचंही अभिनेत्रीने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे.
आलिया भट्टने दिलेल्या मुलाखतीत तिच्या 10 वर्षांच्या करिअरच्या योजनांबद्दल वक्तव्य केलं आहे. आलिया भट्टने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, 'जर मी निर्माता आहे आणि मला नफा मिळत असेल तर ही माझ्यासाठी मोठी गोष्ट असेल पण माझ्यासाठी हे फक्त पैशासाठी नसेल. तर मी उच्च ठिकाणी पोहोचल्यानंतर हे घडलं आणि जिथे मी नवीन टॅलेंटला पाठिंबा देऊ शकते. हे फक्त माझ्या इंजिनला इंधन देण्यासाठी नाही... तर मी ते इंधन वापरू शकते आणि त्यासोबत इतर इंजिनांना इंधन देऊ शकते. शेवटी सिनेमाच्या निमित्ताने सगळं होणार आहे.
आलिया भट्टने तिच्या मुलाखतीत सांगितलं की, 'तिला वाटायचं की, ती अशा लोकांपैकी एक का असू शकत नाही जे क्रिएटिव्ह प्रोडक्शनचा भाग आहेत. क्रिएटिविटीने एखादा प्रोजेक्ट करणं, दिग्दर्शक आणि लेखकाला सोबत घेणं...कदाचित मला कायम चित्रपटात अभिनय करायचा नाही, मला तेच करायचं आहे ज्यामध्ये मी कम्फर्टेबल असेन. जर तुम्ही माझ्या 10 वर्षांच्या योजनेबद्दल विचाराल तर माझी योजना आहे की, मला माझं प्रोडक्शन हाऊस बनवायचं आहे.
आलिया भट्ट 'डार्लिंग्स'मधून निर्माती म्हणून डेब्यू करणार आहे. 'डार्लिंग' हा एक डार्क कॉमेडी सिनेमा आहे. ज्यामध्ये आई-मुलीचं नाते दाखवण्यात आलं आहे. शेफाली शाह या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.