मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या प्रेग्नेसीमुळे खुपच चर्चेत आहे. प्रेग्नेट असून देखील सिनेमाचे शुटींग करतानाचे आलियाचे फोटो देखील समोर आले होते. त्यामुळे या फोटोची चर्चा रंगली होती. मात्र आता आलिया टीव्ही मालिकेत पदार्पण करणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे बॉलिवूडच्या बिग बजेट सिनेमात दिसणारी आलिया मालिकेत का पदार्पण करतेय? असा सवाल अनेकांना पडला आहे. याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या बातमीत मिळणार आहे.
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट सारखी दिसणारी सेलेस्टी बैरागी नावाची मुलगी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. या तरूणीला आलिया भट्टची डुप्लिकेट देखील म्हटले जाते. विशेष म्हणजे सेलेस्टीचा आलिया भट्टच्या एका डायलॉगवर लिपिंग करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओने तिला खुप लोकप्रियता मिळाली होती.
आलियामुळे मिळाली मालिकेत भूमिका
सेलेस्टीने एका मुलाखतीत खुलासा केला की, आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटातील एका दृश्यावर बनवलेल्या रीलमुळे तिला मालिकेत भूमिका मिळाली आहे. सेलेस्टी पुढे म्हणाली, मी माझ्या सोशल मीडिया अकाऊंटवर नवीन रील पोस्ट करत असते. काही महिन्यांपूर्वी, मी एक रील बनवला होता, यामध्ये गंगूबाई काठियावाडीचा एक सीन करत तो पोस्ट केला. निर्मात्यांनी रील पाहिली आणि मला ऑडिशनसाठी बोलावले. काही मॉक शूटनंतर माझी या भूमिकेसाठी निवड झाली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सेलेस्टी स्टार प्लस शोमध्ये राजवीर सिंहसोबत काम करणार आहे. त्याचा 'उडती का नाम रज्जो' हा शो 8 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या शोमध्ये ती तरुण अॅथलीट रज्जोची भूमिका साकारत आहे. या शोसाठी त्याने हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे शूटिंग केले आहे.सेलेस्टी याआधी आसामी वेब फिल्म 'निवीर अरु तारा' मध्ये दिसली आहे.