मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या दोघांनीही नवीन वर्षाच्या आधी बॅग पॅक केली आहे. आणि दोघेही मुंबईत विमानतळावर परदेशात जाताना स्पॉट झाले आहेत.
सध्या काही दिवसांपासून रणबीर आणि आलिया त्यांच्या आगामी ब्रम्हास्त्र सिनेमाचं प्रमोशन करण्यात व्यस्त होते, आता त्यांनी नवीन सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. दोघेही काम बाजूला ठेवून आता नवीन वर्ष साजरे करण्यासाठी निघाले आहेत.
दोघांनी मुंबई सोडून दूर कुठे तरी न्यू इयर सेलिब्रेट करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे दोघेही संध्याकाळी उशिरा विमानतळावर स्पॉट झाले. यादरम्यान रणबीर कपूर नेहमीप्रमाणे स्टाईलमध्ये दिसला पण यावेळी आलियाने तिच्या लूकने कॅमेऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
आलिया विमानतळावर अतिशय हटके लूकमध्ये दिसली. तिने लांब ओव्हरकोट परिधान केल्याचं दिसून आलं.ही स्टाईल आलिया भट्टला पूर्णपणे वेगळा लूक देत होती. त्याचवेळी आलिया आणि रणबीर दोघेही कॅमेऱ्यांसमोर पोज देऊन विमानतळाच्या आत गेले. आता हे दोघे कुठे जाणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
गेल्या वर्षी दोघांनी राजस्थानमध्ये नवीन वर्ष साजरे केले होते. मात्र यावेळी त्यांच्या हॉलिडे डेस्टिनेशनबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.