'द कपिल शर्मा शो'मध्ये काम केल्यामुळे 'या' अभिनेत्याच्या मुलांना वाटायची लाज; Videoद्वारे केला खुलासा

या कलाकाराच्या मुलांना शाळेतही टोमणे ऐकावे लागले होते

Updated: Sep 18, 2022, 09:45 PM IST
'द कपिल शर्मा शो'मध्ये काम केल्यामुळे 'या' अभिनेत्याच्या मुलांना वाटायची लाज; Videoद्वारे केला खुलासा title=

The Kapil Sharma Show : गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा प्रसिद्ध कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) पुन्हा एकदा परतला आहे. यावेळी कलाकारही नवीन आहेत आणि शोची शैलीही. हा शो अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाशी संबधित कलाकारांना मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे ते सर्वाच्यांच परिचयाचे झाले आहेत.

मात्र या शोमुळे एका अभिनेत्याच्या कुटुंबावर वाईट परिणाम झालाय. या शोमधील एका कलाकाराच्या मुलांना त्याच्या अभिनयामुळे शाळेत इतर विद्यार्थी टोमणे मारत असायचे. नुकत्याच एका रिअॅलिटी शोमध्ये अभिनेत्याने हा खुलासा केलाय.

'द कपिल शर्मा शो'चा भाग असलेला अली असगर (Ali Asgar) 'झलक दिखला जा 10' या सेलिब्रिटी डान्स रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे. या शोमध्ये, अभिनेत्याच्या मुलांचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये त्याने सांगितले की कपिल शर्मा शोचा एक भाग असल्यामुळे शाळेत त्यांना अनेक टोमणे ऐकायला मिळायचे. 

या व्हिडिओमध्ये अली असगरची मुलगी अदा तिच्या वडिलांच्या कामामुळे शाळेत होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल बोलत आहे. अदा म्हणाली की शाळेतील मित्र मला चिडवायचे. ते म्हणायचे, तुला दोन आई आहेत. ते दादी का बेटा, दादी की बेटी, बसंती वगैरे म्हणत.

मात्र अदाने हे देखील सांगितले की तिला ट्रोलिंगची पर्वा नाही आणि इतरांना हसवण्यासाठी स्वतःची चेष्टा करणाबद्दल वडिलांचा अभिमान आहे. शेवटी ती म्हणाली की प्रत्येकासाठी हे सोपे नसते. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो बाबा.

अली हे ऐकून भावूक झाला आणि त्याने सांगितले की, त्याला अनेक दिवसांपासून फक्त एक महिला म्हणून ओळखले जात आहे. अली म्हणाला की, मी खूप दिवसांपासून काम करत आहे आणि जेव्हापासून 'दादी'चा रोल सुरू झाला, त्याआधीही मी महिला म्हणून काही कामात काम केले आहे. मग एक वेळ आली जेव्हा मी आठवड्यातून चार दिवस एक स्त्री म्हणून टीव्हीवर होतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

अलीने असेही सांगितले की जेव्हा त्याच्या मुलाने एकदा त्याला 'तुम्हाला दुसरं काही येत नाही का?' असं विचारलं होतं. मुलगा चालू शो सोडून निघून गेल्यानंतर अलीने हे काम करणे बंद केले.