मुंबई : येताय ना रे नाटक बघायला? कोणी आहे का आसपास नाटक वेडा इकडे? वाट पाहून पाहून दमले गं बाई, किती दिवस झाले कोरोनामुळे नाट्यगृह बंद होती, तुम्हालाही भेटता येत नव्हतं पण आता हे चित्र बदललंय, नाट्यगृह पुन्हा सुरू होतायत, तुम्ही प्रेक्षकानी जरूर यायचं नाट्यगृहात न घाबरता सुरक्षेची सगळी काळजी घेऊन.
तोपर्यंत खास बालदिनानिम्मित बच्चेकंपनीच्या मनोरंजनासाठी ही चिंची चेटकीण येतेय तुमच्या घरी पाहायला विसरू नका 'अलबत्या गलबत्या' रविवार 15 नोव्हेंबरला दुपारी 12 आणि संध्या. 7 वा. फक्त झी मराठीवर. तुम्ही येत नाही मग मी ठरवलं तुम्हालाच एक दिवस भेटायला यायचं पण हा एकच दिवस हा.. याचं रिपीट टेलिकास्ट लागणार नाही.. यानंतर मी तुम्हाला भेटेन डायरेक्ट नाट्यगृहात.. मग भेटूया 15 तारखेला झी मराठीवर.. किती गं बाई मी हुशार, किती गं बाई मी हुशार.
मनाने लहान असणाऱ्या सर्वांसाठी ही खास वेशभूषा स्पर्धा. सहभागी होण्यासाठी चेटकिणीच्या वेशातले तुमचे फोटो आम्हाला ११...
Posted by zee marathi on Monday, November 9, 2020
एकदा माझी जादूची आगपेटी सापडू दे नाय जाळला ना या करोनाला तर नाव लावणार नाय चिंची चेटकीण..