...म्हणून दीपिकाने सोशल मीडियावरील नाव बदलले

गेल्या काही दिवसांपासून ती संकटांचा सामना करत आहे.     

Updated: Nov 9, 2020, 06:44 PM IST
...म्हणून दीपिकाने सोशल मीडियावरील नाव बदलले  title=

मुंबई : स्वप्नांची नगरी मुंबईमध्ये अनेकांच्या स्वप्नांना उंच भरारी घेण्यासाठी संधी आणि मार्ग मिळाला. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोण. आज प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींच्या यादीमध्ये तिचे नाव अव्वल स्तरावर असून तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.  बॉलिवूडमध्ये पदार्पण करून दीपिकाला अनेक वर्ष झाली आहेत. आजच्याच दिवशी तिचा पहिला चित्रपट 'ओम शांती ओम' रूपेरी पडद्यावर झळकला होता. या चित्रपटाला प्रदर्शित होवून आज १३ वर्ष पूर्ण झाली आहेत. याचा आनंद दीपिका साजरा करत आहे. 

'ओम शांती ओम' या चित्रपटामुळे दीपिकाच्या करियरला चांगलीचं कलाटनी मिळाली. या चित्रपटामध्ये तिने अभिनेता शाहरूख खान सोबत स्क्रिन शेअर केली. तेव्हा या जोडीला चाहत्यांनी चांगलेचं डोक्यावर घेतले होते. शिवाय प्रेम कथेवर आधारलेल्या चित्रपटातील गाण्यांना चाहत्यांनी पसंती दर्शवली. 

म्हणून, आजच्या आनंदाच्या दिवशी दीपिकाने सोशल मीडियावर आपले नाव बदलून 'शांतिप्रिया' असं ठेवलं आहे. एवढचं नाही तर तिने प्रोफाईल फोटो देखील बदलला आहे. 'ओम शांती ओम' चित्रपटातील शाहरूखसोबत तिने फोटो ठेवला आहे. 

'ओम शांती ओम' नंतर तिने 'पिकू', 'मस्तानी', 'पद्मावत' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तिने आपला प्रवास फक्त बॉलिवूडपूरता मर्यादित न ठेवता हॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.