भारत-इंडिया वाद सुरू असतानाच अक्षय कुमारनं मारली बाजी!

देशात सध्या भारत विरुद्ध इंडिया असा वाद रंगला आहे. यादरम्यान भाजपा समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने मोठा निर्णय घेतला आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 6, 2023, 07:49 PM IST
भारत-इंडिया वाद सुरू असतानाच अक्षय कुमारनं मारली बाजी! title=

देशात सध्या 'भारत विरुद्ध इंडिया' असा वाद रंगला आहे. याचं कारण केंद्र सरकार आगामी काळात सर्व ठिकाणी 'इंडिया'ऐवजी 'भारत' हा शब्दप्रयोग केला जावा यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगली आहे. केंद्र सरकार आता संविधानात दुरुस्ती करण्याची शक्यता असून विशेष अधिवेशनात यासंबंधी प्रस्ताव आणला जाऊ शकतो. त्यानंतर संपूर्ण देशभऱात इंडिया विरुद्ध भारत हीच चर्चा रंगली आहे. यादरम्यान भाजपा समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षय कुमारने मोठा निर्णय घेतला आहे. 

अक्षय कुमारने आपला आगामी चित्रपट 'द ग्रेट इंडियन रेस्क्यू'चं नाव बदललं आहे. आता या चित्रपटाचं नाव बदलून 'मिशन रानीगंज:द ग्रेट इंडियन रेस्क्यू' असं ठेवण्यात आलं आहे. केंद्र सरकार आता भारत नावाचा वापर करण्याचा निर्णय घेणार असल्याची चर्चा रंगलेली असतानाच अक्षय कुमारने हा निर्णय घेतला आहे. याआधी बॉलिवूड बिग बी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर 'भारत माता की जय' लिहित आपलं मत नोंदवलं होतं. 

अक्षय कुमारने बदललं चित्रपटाचं नाव

या चित्रपटाचा पहिला मोशन पोस्टर अक्षय कुमारने सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. या टिझरमध्ये अक्षय कुमार मायनिंग इंजिनिअर जसवंत सिंग गिल यांच्या भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट जसवंत सिंग आणि त्यांच्या शौर्यावर आधारित आहे. 1989 मध्ये जसवंत सिंग यांनी जमिनीत 350 फूट खाली अडकलेल्या 65 खाण कामगारांना सुरक्षित बाहेर काढलं होतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

बिहारच्या राणीगंज येथे ही घटना घडली होती. त्यामुळे या बचावकार्याला 'मिशन राणीगंज' म्हणूनही ओळखलं जातं. याआधी या चित्रपटाचं नाव 'द ग्रेट इंडियन रेस्क्यू' ठेवण्यात आलं होतं. पण आता अक्षय कुमारने नवा व्हिडीओ जारी केलीा असून, चित्रपटाचं नाव 'मिशन राणीगंज:द ग्रेट इंडियन रेस्क्यू' असल्याचं जाहीर केलं आहे. चित्रपटाला पहिला टिझर 7 सप्टेंबरला प्रदर्शित केला जाणार आहे. 

अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाचं नाव बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्यावर्षी जेव्हा या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती तेव्हा त्याचं नवा 'कॅप्सूल गिल' ठेवण्यात आलं होतं. यानंतर 'द ग्रेट इंडियन रेस्क्यू'  आणि आता 'मिशन राणीगंज:द ग्रेट इंडियन रेस्क्यू' असं बदलण्यात आलं आहे. यासह चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट दिवाळीला 6 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. 

मिशन राणीगंजमध्ये अक्षय कुमारसह परिणीती चोप्रा दिसणार आहे. याआधी केसरी चित्रपटात ही जोडी एकत्र दिसली होती.