रंगमंचावर नाटकाचा प्रयोग करणाऱ्या 'या' 5 मराठी सेलिब्रेटींना ओळखलंत का?

Marathi Actors:  मराठी कलाकांराचे जुने फोटो हे सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होताना दिसतात त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. यावेळीही त्यांचा असाच एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 6, 2023, 06:39 PM IST
रंगमंचावर नाटकाचा प्रयोग करणाऱ्या 'या' 5 मराठी सेलिब्रेटींना ओळखलंत का? title=
can you recognise these five celebs on stage photo goes viral on instagram (Photo: Kedar Shinde Instagram)

Marathi Actors: सोशल मीडियावर चर्चा असते ती म्हणजे कलाकारांच्या जुन्या फोटोंची. त्यांचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. त्यामुळे असे व्हायरल झालेले व्हिडीओ हे कायमच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. सध्या असाच एक फोटो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो आहे. यावेळी तुम्ही या फोटोत पाहू शकता की कलाकार हे रंगमंचावर नाटकाचा प्रयोग सादर करताना दिसत आहेत. यावेळी त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. तुम्हाला कदाचित पाहून वाटेलच की या फोटोमध्ये काहीतरी ओळखीचं दिसते आहे.

तुम्ही नीट पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की यावेळी या फोटोत चक्क पाच लोकप्रिय कलाकार दिसत आहेत. तुमच्या एव्हाना लक्षातही आले असेल. हो, तुम्ही अगदी बरोबर ओळखलंत. हे पाचही मित्र एकमेकांचे जिवश्य-कंठश्य असे मित्र आहेत. त्यांची सोशल मीडियावर अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्यांचे अनेक फॅन्सही आहेत. बरोबर तुम्ही जे ओळखलंत ते बरोबर आहे. 

यावेळी या फ्रेममध्ये दिसणारे सेलिब्रेटी दुसरे तिसरे कोणी नसून भरत जाधव, अकुंश चौधरी, केदार शिंदे, जयराज नायर, अरूण कदम दिसत आहेत. आपल्याला माहितीच आहे की या दोघांची मैत्री ही किती घट्ट आहे. त्यांची अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते. केदार शिंदे यांनी मैत्री दिनाच्या निमित्तानं हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यांनी या खाली कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ''काही गोष्टींची सुरूवात करताना.. आपल्यासोबत चे सवंगडी आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात. माझ्या आयुष्यातील हीच ती लोकं.. कोण कोण आहेत? ओळखलत तर comments मध्ये सांगा.'' असे त्यांनी लिहिले होते. 

हेही वाचा : Trade Analysis: 7 लाख तिकीटं बुक, भल्या पहाटे शो; पहिल्याच दिवशी 'जवान' मोडणार इतके रेकॉर्ड

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

केदार शिंदे यांचा बाईपण भारी देवा हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यातून या चित्रपट 90 कोटींच्या आसपास कमाई केली आहे. हा चित्रपट मराठीतला सर्वाधिक लोकप्रिय आण बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. त्यामुळे या चित्रपटाची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगलेली होती. अकुंश चौधरी हा देखील मराठी चित्रपटसृष्टीतला सर्वाधिक कमाई केलेला चित्रपट आहे. त्यामुळे त्याचीही चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. भरत जाधव हे तर मराठीचे सुपरस्टार आहेत. त्यामुळे त्यांच्या अभिनयाला कसलीच तोड नसते. या तिघांची मैत्री किती मोठी आहे याची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x