...यामुळे कोटींच्या घरात पोहोचलीये या कुत्र्याची किंमत

सुरपरस्टार रजनीकांतसोबत जोडलेली प्रत्येक गोष्ट अनोखी असते. सध्या त्यांच्या आगामी काला या सिनेमाची चांगलीच चर्चा आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 10, 2018, 02:43 PM IST
...यामुळे कोटींच्या घरात पोहोचलीये या कुत्र्याची किंमत title=

मुंबई : सुरपरस्टार रजनीकांतसोबत जोडलेली प्रत्येक गोष्ट अनोखी असते. सध्या त्यांच्या आगामी काला या सिनेमाची चांगलीच चर्चा आहे.

कुत्र्याची चर्चा

सिनेमाच्या पोस्टरमध्ये रजनीकांचा यांच्या बाजूला असलेल्या एका कुत्र्याची देखील खास चर्चा आहे. या पोस्टरमध्ये दिसणाऱ्या कुत्र्याची किंमत कोटींमध्ये असल्याचं बोललं जातंय. मनी असं या कुत्र्याचं नाव आहे. 

का आहे मागणी?

प्रोफशनल अॅनिमल ट्रेनर सिमोन यांच्या मते, मलेशियामध्ये काही लोकं मनीला करोडो रुपये देऊन घेऊ इच्छित आहेत. यामागचं कारण इतकच की तो रजनीकांत यांच्यासोबत पोस्टरमध्ये दिसतोय. रजनीकांत या मनीसाठी रोज एक बिस्कीटचा पुडा घेऊन येतात. यामुळे ट्रेनरचं काम अजून सोपं होऊन जातं.

कोटींमध्ये किंमत

रजनीकांत आणि मनीमध्ये आता योग्य ताळमेळ बसलाय. मनीला निवडण्याआधी ३० कुत्र्यांचं देखील ऑडिशन झालं. मनीची किंमत सध्या २ कोटींवर पोहोचली आहे. १ कोटी घेऊन तर अनेक जण आताही तयार आहेत.