बॉक्स ऑफिसवर अजय देवगणचा हंगामा

बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या 'गोलमाल अगेन' या सिनेमाने पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली. या सिनेमाने पहिल्या दिवशी तब्बल ३०.१४ कोटी रुपयांची कमाई केली. 

Updated: Oct 22, 2017, 01:33 PM IST
बॉक्स ऑफिसवर अजय देवगणचा हंगामा title=

मुंबई : बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या 'गोलमाल अगेन' या सिनेमाने पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली. या सिनेमाने पहिल्या दिवशी तब्बल ३०.१४ कोटी रुपयांची कमाई केली. 

'गोलमाल अगेन' हा सिनेमा गोलमालच्या सीरिजमधील चौथा सिनेमा आहे. गोलमाल सीरिजमधील आतापर्यंतच्या सिनेमांच्या कमाईवर नजर टाकली असता सर्वच सिनेमांनी चांगली कमाई केलीये. 

तीनही खानांना टाकले मागे

याआधी २०१४मध्ये आलेल्या अजयच्या 'सिंघम रिटर्न्स' या सिनेमाने पहिल्या दिवशी ३२.९ कोटींची कमाई केली होती. बॉक्स ऑफिसवर या वर्षी पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत अजयने तीनही खानांना मागे टाकलेय. 

'गोलमान अगेन'च्या आदल्या दिवशी रिलीज झालेल्या आमिर खानच्या सिक्रेट सुपरस्टार या सिनेमाने पहिल्या दिवशी ४.८० कोटी रुपयांची कमाई केली. तर सलमान खानच्या ट्यूबलाईट या सिनेमाने २१.१५ कोटी आणि शाहरुख खानच्या रईस सिनेमाने २०.४२ कोटी रुपये कमावले होते. 

मनोरंजनाने परिपूर्ण गोलमाल

'गोलमाल अगेन' या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. दोन दोन वर्षात गोलमाल सीरिजमधील सिनेमे आल्यानंतर हा तब्बल सात वर्षांनी रोहित शेट्टीने हा सिनेमा आणला. 'गोलमान अगेन' हा सिनेम मनोरंजनाने भरलेला आहे. यात अजय देवगणसह अर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू, श्रेयस तळपदे, जॉनी लिव्हर, संजय मिश्रा, मुकेश तिवारी, वृजेश हिरजी, तब्बू आणि परिणीती चोप्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत.