Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा आजूनही जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत समावेश आहे. ऐश्वर्याने 1994 मध्ये 'मिस वर्ल्ड'चा किताब पटकावला. त्यानंतर ऐश्वर्या रायने अनेक वर्षे मॉडेलिंगच्या जगावर राज्य केले. मॉडेलिंगमध्ये आपला ठसा उमटवल्यानंतर ऐश्वर्या रायने चित्रपटांमध्ये प्रवेश केला. परंतु, फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वीच संजय दत्तने ऐश्वर्या रायला बॉलिवूडपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता.
संजय दत्त आणि ऐश्वर्या राय यांची पहिली भेट ही एका मॅगझिन फोटोशूटच्या वेळी झाली होती. संजय दत्तने एकत्र काम करण्यापूर्वी पेप्सीच्या जाहिरातीमध्ये ऐश्वर्या रायला पाहिले. संजय दत्तची बहीण प्रिया आणि नम्रता दोघींना ऐश्वर्याच्या सौंदर्याने वेड लावले होते. त्यावेळी एकत्र फोटोशूट करताना संजय दत्तने ऐश्वर्या रायला एक सल्ला दिला होता. ज्यामध्ये त्याने म्हटले होते की, ऐश्वर्याने चित्रपटांपासून दूर राहून तिच्या मॉडेलिंग करिअरवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
संजय दत्तकडून ऐश्वर्याला चित्रपटांपासून दूर राहण्याचा सल्ला
सिनेब्लिट्झला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता संजय दत्तने ऐश्वर्या रायला अभिनयापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. संजय दत्तने या मुलाखतीत म्हटले होते की, पेप्सीच्या जाहिरातीत ऐश्वर्याला पाहताच मला वाटले ती सुंदर मुलगी कोण आहे? त्याच मुलाखतीत संजय दत्तने सांगितले होते की, त्याने ऐश्वर्याला अभिनयापासून दूर राहण्यास सांगितले होते. तर जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये येता तेव्हा तुमच्यात अनेक बदल होतात. त्यामुळे चेहऱ्यावरील सौंदर्य आणि निरागसता हरवून जाईल. तुम्हाला फिल्म इंडस्ट्री सांभाळायची आहे जो सोपी गोष्ट नाही असं संजय दत्त म्हणाला होता.
पदार्पणापूर्वीच संजय दत्तने इंडस्ट्रीचे सत्य दाखवले
अनेकांना वाटते की मी यापेक्षा चांगले दिसले पाहिजे. मला तिथे पोहोचायचे आहे. पण जर तुम्ही दोन पायऱ्या चढलात तर तुम्हाला 500 लोक मागे खेचताना दिसतील. इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर तुम्ही बदलता. तुमची निरागसता आणि सौंदर्य काढून घेतले जाते असं संजय दत्तने सांगितले होते. त्यावेळी संजय दत्तच्या म्हणण्याशी ऐश्वर्या राय देखील सहमत होती. जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येते तेव्हा तुमच्या पाठीशी कोणीही उभे नसते असं ऐश्वर्याने म्हटले होते.