आराध्यासोबत घडलेल्या घटनेनंतर Aishwarya Rai ने उचललं 'हे' पाऊल

ऐश्वर्या राय बच्चन आपली मुलगी आराध्याबाबत खूप सावध आहे. 

Updated: Oct 31, 2021, 06:53 PM IST
आराध्यासोबत घडलेल्या घटनेनंतर Aishwarya Rai ने उचललं 'हे' पाऊल title=

मुंबई : ऐश्वर्या राय बच्चन आपली मुलगी आराध्याबाबत खूप सावध आहे. कधी कधी ती सोशल मीडियावर ट्रोलही होते, कारण ती आपल्या मुलीचा हात कधीच सोडत नाही. फार कमी लोकांना माहिती असेल की, ऐश्वर्या आधी आराध्याबद्दल इतकी असुरक्षित नव्हती. एका घटनेनंतर ती मुलीची अधिक काळजी घेऊ लागली आहे.

रेड कार्पेट असो किंवा कोणताही मीडिया इव्हेंट, आराध्या बच्चन जिथे जाते तिथे नेहमीच तिच्या आईचा हात धरताना दिसते. अमिताभ बच्चन यांची सून आणि अभिषेक बच्चनची पत्नी ऐश्वर्याने आपली मुलगी आराध्याचा हात कधीच सोडला नाही. यामागचे कारण तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

एका मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितले होते की, ती घरातून बाहेर येताच आराध्याचा हात धरते.

ऐशने सांगितले होते की, आराध्या लहानपणापासूनच चर्चेत आहे. तिला कॅमेरे आवडतात आणि ती आनंदाने फोटो काढते. पण एकदा तिने असे केले ते पाहून तिला आश्चर्य वाटले.
ऐश म्हणाली की एकदा आराध्याने तिच्या फोटोंसाठी जमिनीवर रेंगाळायला सुरुवात केली आणि हा खरोखरच खूप चिंताजनक विषय होता.

ऐश्वर्याने सांगितले की, आराध्या कॅमेऱ्यांसाठी उत्तेजित होणे स्वाभाविक आहे, पण तिचे अचानक वागणे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य नव्हते.