विकी कौशल आणि कतरिनाच्या विवाहस्थळावर एक रात्र रहाण्यासाठी मोजावे लागतात एवढे पैसे

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या आगामी 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Updated: Oct 31, 2021, 06:49 PM IST
विकी कौशल आणि कतरिनाच्या विवाहस्थळावर एक रात्र रहाण्यासाठी मोजावे लागतात एवढे पैसे title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या आगामी 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र चित्रपटापेक्षा तिच्या लग्नाचीच सगळीकडे चर्चा आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, कतरिना कैफ आणि विकी कौशल या वर्षी डिसेंबर महिन्यात 7 फेरे घेणार आहेत. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाच्या ठिकाणाबाबतही अनेक प्रकारच्या बातम्या समोर आल्या आहेत.

विकी आणि कतरिना त्यांच्या लग्नाला अविस्मरणीय बनवण्यासाठी राजस्थानमधील 700 वर्ष जुन्या सवाई माधोपूर किल्ल्यावर सात फेरे घेतील. यापूर्वी सोशल मीडियावर किल्ल्यातील अनेक फोटो व्हायरल झाले होते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, जर तुम्ही या हॉटेलमध्ये राहायला गेलात तर तुम्हाला तुमच्या खिशातून किती पैसे मोजावे लागतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर तुम्हाला सवाई माधोपूरमध्ये एक रात्र घालवायची असेल तर तुम्हाला 77,000 बुकिंग रक्कम भरावी लागेल. एवढंच नाही तर टॅक्स जोडून खर्च ९० हजारांच्या आसपास पोहोचेल. ही किंमत फक्त सामान्य रुमसाठी आहे.

जर स्पेशल रुमबद्दल बोलायचं झालं तर या किल्ल्यात राजा मानसिंग सूट आहे. यामध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी 4 लाख 94 हजारांचे बुकिंग किंमत आहे. यामध्ये टॅक्स जोडला तर एका रात्रीचा खर्च सुमारे ५ लाख ८ हजार इतका होतो. अशा परिस्थितीत विकी कौशल आणि कतरिना कैफ जिथे लग्न करणार आहेत तिथे राहण्यासाठी सामान्य माणसाला वर्षभराची कमाई खर्च करावी लागेल असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. 

सवाई माधोपूरमध्ये वेळ घालवणाऱ्यांसाठी अनेक फायदे आहेत. त्यांना हॉटेलची सुविधा मिळते पण किल्ल्याच्या आत तुम्ही राजे आणि सम्राटांच्या जीवनाचा आनंद घेऊ शकता. या किल्ल्यातील अनेक गोष्टी 700 वर्षांपूर्वी जशा होत्या तशाच आहेत.