ऐश्वर्या राय दुसऱ्यांदा होणार आई, बच्चन कुटुंबात लवकरच चिमुकल्याचं आगमन?

खरंतर ऐश्वर्यानं सांगितलेली ही बाजू एकदम परफेक्ट आहेत. कारण लग्न झाल्यानंतर अभिनेत्रींचं वजन वाढताच त्या गरोदर असल्याच्या चर्चा सुरु होतात.

Updated: Jul 23, 2021, 05:37 PM IST
ऐश्वर्या राय दुसऱ्यांदा होणार आई, बच्चन कुटुंबात लवकरच चिमुकल्याचं आगमन? title=

मुंबई : 2012 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत जेव्हा ऐश्वर्या राय बच्चनला 'जेव्हा गरोदरपणानंतर वजन वाढल्यामुळे तुला ट्रोल केले गेलं तेव्हा या गोष्टींकडे तु कसं पाहिलं होतं. याचा तुझ्यावर कसा परिणाम झाला? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना ऐश्वर्या  म्हणाली, 'मी कधीही अशा चर्चांकडे लक्ष देत नाही. मी खूप लांबपर्यंत प्रवास करुन इथंवर पोहोचले आहे. त्यामुळे मी अशाप्रकारच्या गोष्टींचा सामना करण्यासाठी नेहमीच तयार असते.

खरंतर ऐश्वर्यानं सांगितलेली ही बाजू एकदम परफेक्ट आहेत. कारण लग्न झाल्यानंतर अभिनेत्रींचं वजन वाढताच त्या गरोदर असल्याच्या चर्चा सुरु होतात.प्रियांका चोप्रा, विद्या बालन आणि दीपिका पादुकोणदेखील अशा चर्चांचा परिणाम स्वत:वर होऊ देत नाहीत. 2019 मध्ये ऐश्वर्या राय बच्चन दुसऱ्यांदा आई होणार असल्याचं बोललं जात होतं. यावेळी ऐश्वर्याने परिधान केलेले ड्रेस पाहून ती आई होणार असल्याचे संकेत दिसून येत होते. 

ऐश्वर्या राय बच्चनने पती अभिषेक बच्चनसोबत मुकेश अंबानी यांच्या एका फॅमिली फक्शनला हजेरी लावली होती. मुकेश अंबानी यांची बहिण नीना कोठारी यांच्या मुलीच्या प्री-वेडींग पार्टीला ऐश्वर्या आणि अभिषेक जोडीने पोहोचले होते. नीना कोठारी यांनी या पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला अनेक बॉलिवूड स्टार हजर होते. 

 ऐश्वर्याने यावेळी लाल रंगाचा ओवर साईज ड्रेस घातला होता. फोटो काढण्यासाठी कॅमेरासमोर येताच तिने हातावर घेतलेल्या दुपट्याने आपलं बेबी बंब लपवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं. मीडियापासून आपल्या प्रेग्नेंसीची बातमी लपवण्यासाठी ऐश्वर्याने लाल रंगाचा ओवर साईज ड्रेस या पार्टीला घातल्याचं दिसून आलं.

पण ऐश्वर्याचं वाढलेलं वजन पाहता बच्चन कुटुंबात चिमुकल्याचं लवकरच आगमन होणार असल्याची चर्चा सुरु झाली. ऐश्वर्या आणि अभिषेक आपल्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत.

ऐश्वर्याच्या स्टाईलिंगबद्दल सांगायचं झालं , तर ऐश्वर्याने परिधान केलेला हा लाल रंगाचा ड्रेस सब्यसाची यांच्या लेटेस्ट कलेक्शनपैकी एक आहे. सोशल मीडियावर या पार्टीचे फोटो व्हायरल होताच ऐश्वर्या लवकरच गुड न्यूज देणार असल्याचं समजतंय.