'सर्वांनी मिळून माझ्यावर...', करण जोहरच्या चित्रपटाला नकार देण्याविषयी Aishwarya Rai चा खुलासा

Aishwarya Rai नं दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Updated: Dec 12, 2022, 11:09 AM IST
'सर्वांनी मिळून माझ्यावर...', करण जोहरच्या चित्रपटाला नकार देण्याविषयी Aishwarya Rai चा खुलासा title=

Aishwarya Rai On Getting Lynched : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्यानं आता पर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. काही चित्रपटांना ऐश्वर्यानं नकार दिला होता. त्यापैकी एक म्हणजे 1998 साली प्रदर्शित झालेला 'कुछ कुछ होता है' (Kuch Kuch Hota Hai). या चित्रपटात बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shah Rukh Khan), राणी मुखर्जी (Rani Mukerji) आणि काजोल (Kajol) यांच्या मुख्य भूमिका होत्या. दरम्यान, राणी मुखर्जी आधी टीनाची भूमिका ही ऐश्वर्या रायला (Aishwarya Rai) ऑफर केली होती. पण तिनं या भूमिकेसाठी नकार दिला होता. त्याचा खुलासा ऐश्वर्यानं एका मुलाखतीत केला होता. 

राणीनं 'कुछ कुछ होता है'मध्ये टीनाची भूमिका साकारली होती, मात्र त्यापूर्वी या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींना अप्रोच करण्यात आले होते. ऐश्वर्या राय बच्चन देखील त्यापैकी एक होती, परंतु तिनं भूमिका नाकारली. 1999 मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ऐश्वर्याने करण जोहरचा चित्रपट का नाकारला याचा खुलासा केला. राणी म्हणाली, 'कुछ कुछ होता है'साठी करण जोहरनं माझ्याशी संपर्क साधला होता, पण तो जी तारिख मागत होता ती तारिख मी आधीच आरके फिल्मसला दिल्या होत्या.' (aishwarya rai bachchan refused to work in kuch kuch hota hai said she would have been lynched if she did the film) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पाहा काय म्हणाली ऐश्वर्या

ऐश्वर्याने पुढे सांगितले की, तिला 'कुछ कुछ होता है' या चित्रपटात अशा भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, जी ती तिच्या मॉडेलिंगच्या काळात करत होती. केस सरळ करणं, मिनी स्कर्ट घालणं, कॅमेऱ्यासमोर ग्लॅमर दाखवणं. जर मी हा चित्रपट केला असता तर माझी लिंचिंग झाली असती. (सगळ्यांनी मिळून माझ्यावर हल्ला केला असता हा संदर्भ लावत ऐश्वर्यानं लिंचिंग हा शब्द प्रयोग केला आहे.)

हेही वाचा : गडगंज संपत्ती असूनही Rajinikanth यांचं पहिलं प्रेम अपूर्ण; गोष्ट लग्नापर्यंत पोहोचली पण...

त्यानंतर राणी मुखर्जीनं 'कुछ कुछ होता है'मध्ये टीनाची भूमिका साकारली. यापूर्वी ही भूमिका ट्विंकल खन्ना, जुही चावला, उर्मिला मातोंडकर आणि अनेक अभिनेत्रींना गेली होती. त्यावेळी राणी मुखर्जी चित्रपटसृष्टीत पूर्णपणे नवीन होती. तिनं फक्त 'राजा की आयेगी बारात'मध्ये काम केले होते, पण 'कुछ कुछ होता है'ने तिचे आयुष्य बदलून टाकले. ती रातोरात स्टार बनली होती.