मुंबई : अनेकदा ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची लेक आराध्या बच्चन या दोघींना अनेकदा एकत्र स्पॉट केलं जातं. या दोघींची अनेकदा चर्चा ही होते. कधी आराध्याचं झपाट्याने मोठं होणं असो किंवा तिच्यात होणारे बदल असो आराध्या कायमच चर्चेत असते. तर बऱ्याचदा आराध्याला ऐश्वर्या अति प्रोटेक्ट करताना दिसते. त्यामुळेच अभिनेत्री अनेकदा ट्रोलही होते. असाच काहीसा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओत ऐश्वर्या आराध्या दिसत आहेत, मात्र यावेळी ऐश्वर्या पुन्हा एकदा ट्रोल झालीये. पण यावेळी तिच्या ट्रोलिंगचं नेमकं कारण काय आहे हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
समोर आलेल्या व्हिडिओत ऐश्वर्या आणि आराध्या बर्थडे सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. खरंतर सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ जुना आहे. व्हिडिओमध्ये, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या त्यांच्या परिवारासोबत आणि मित्र परिवारासोबत दिसत आहेत. यावेळी आराध्या त्यांच्यासोबत केक कापताना दिसत आहे. हा व्हिडिओ आराध्याच्या 11व्या वाढदिवसाचा आहे. यावेळी तिच्या आजूबाजूला तिचे आई बाबा तिचे आजी आजोबा म्हणजेच बीग बी आणि जया बच्चन देखील दिसत आहेत.
व्हिडिओच्या सुरुवातीला आराध्या केकवरील मेणबत्त्या पेटवण्याआधी तिच्या मैत्रिणींसोबत त्या मेणबत्या मोजत असताना दिसली, यानंतर तिची आई तिच्या कानात काहीतरी कुजबुजताना दिसली. यानंतर आराध्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले. यानंतर आराध्या तिच्या केकवर मेणबत्त्या पेटवत असताना तिची आई तिचे हात घट्ट धरून बसलेली दिसली. यानंतर सगळेजण टाळ्या वाजवत वाढदिवसाच्या शुभेच्छा देत गाणं म्हणताना दिसले. हा व्हिडिओ झूमने त्यांच्या युट्यूबर शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये ऐश्वर्याने आराध्याशी केलेल्या कृत्याने नेटिझन्सला नाराज केलं आहे. यानंतर युजर्सने कमेंट करत तिला चांगलंच सुनावलं आहे. युजर्सने ऐश्वर्यावर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. व्हिडिओवर प्रतिक्रिया देत, एका नेटिझनने म्हटलं आहे की, " आराध्याची आई जरा जास्तच प्रोटेक्टिव्ह आहे. तिला मेणबत्ती विझवताना तिच्या मुलीचा हात धरण्याची काहीच गरज नव्हती. ती स्वतःहून उभी राहण्याइतकी वयाची होती." तर अजूनएका नेटिझनने लिहिलंय की, "मुलीला चाईल्ड माता बनू द्या, गरीब मुलगी खुलेपणाने मजा करू शकते." तर अजून एकाने म्हटलंय, 'कंट्रोलिंग आई' अशा अनेक प्रकारच्या कमेंट सोशल मीडिया युजर्स कमेंट बॉक्समध्ये करत आहेत.
याचबरोबर बच्चन कुटुंब आणि अभिषेक बच्चन यांनी नेहमीच हे अनेकदा कबूल केलं आहे की, ऐश्वर्याने आपल्या मुलीला ज्या पद्धतीने वाढवलं आहे त्याचा त्यांना अभिमान वाटतो. पुन्हा एकदा, जेव्हा आई-मुलीची जोडी दिसली तेव्हा नेटिझन्सनी ऐश्वर्याला तिच्या मुलीला स्वातंत्र्य न दिल्याबद्दल ट्रोल केलं आहे.