'झी मराठी अवॉर्ड'मध्ये ऐश्वर्या नारकर आणि अविनाश यांनी माधुरीसोबत धरला ठेका; पाहा व्हिडीओ

मराठमोळ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी 90 चं दशक गाजवलं. त्या काळात त्यांच्या या भूमिका आजही त्यांच्या लक्षात आहेत. ऐश्वर्या यांनी त्यांची पन्नाशी ओलांडली असतील तरी त्यांच्यात असलेला उत्साह हा तरुणाईलाच लाजवणारा आहे. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.

Updated: Oct 28, 2023, 03:26 PM IST
'झी मराठी अवॉर्ड'मध्ये ऐश्वर्या नारकर आणि अविनाश यांनी माधुरीसोबत धरला ठेका; पाहा व्हिडीओ title=

मुंबई : मराठमोळ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी 90 चं दशक गाजवलं. त्या काळात त्यांच्या या भूमिका आजही त्यांच्या लक्षात आहेत. ऐश्वर्या यांनी त्यांची पन्नाशी ओलांडली असतील तरी त्यांच्यात असलेला उत्साह हा तरुणाईलाच लाजवणारा आहे. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या सर्वांच्याच लाडक्या अभिनेत्री आहेत. आपल्या हटके अभिनयानं त्या सगळ्यांचेच मनोरंजन करताना दिसतात. टेलिव्हिजन क्षेत्रातही त्या फार सक्रिय आहेत. त्यांच्या अनेक भुमिका या गाजल्या आहेत. या सुखांनो या पासून ते स्वामिनीतील गोपिकाबाई ते आता सातव्या मुलीची सातवी मुलगी. त्यांच्या अभिनयाचे सर्वच जणं फॅन्स आहेत. त्यामुळे त्यांची अनेकदा चर्चा रंगताना दिसते. ऐश्वर्या नारकर या सोशल मीडियावरही एक्टिव आहेत. त्यामुळेही त्यांची जोरात चर्चा असते.

सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि त्यांचे पती अभिनेता अविनाश नारकर यांचे रिल्स व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरुये. मात्र यामुळेच या दोघांना अनेकदा ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे. बहुतेकवेळा हे कपल सोशल मीडियावर त्यांच्या डान्सचे व्हिडीओ पोस्ट करतात. जे सोशल मीडियावर काहीचवेळात व्हायरल  होतात. मात्र आता असा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ही जोडी चक्का धक-धक गर्ल माधुरी दिक्षितसोबत थिरकताना दिसत आहे. झी मराठी अवॉर्ड सोहळ्यादरम्यान हा सुंदर क्षण पार पडला. खरंतर डॉ. निलेश साबळे यांनी अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांना मंचावर बोलावलं. यानंतर माधुरी यांना तिच्यासोबत डान्स करण्याचं आवानही केलं.

मग काय! बाई गं या गाण्यावर माधुरीसोबत अविनाश यांनी ठेका धरला. हा संपुर्ण सोनेरी क्षण जर तुम्हाला पाहायचा असेल तर मात्र तुम्हाला झी मराठी अवॉर्ड २०२३ पाहावा लागणार आहे. येत्या 4 नोव्हेंबर, शनिवार, 7 वाजता झी मराठीवर हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.

ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर यांच्याकडे ९०च्या दशकातील मराठमोळ लोकप्रिय जोडपं म्हणून पाहिलं जातं. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही क्षेत्रात ऐश्वर्या व अविनाश यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या जोडीने पन्नाशी ओलांडली असली तरी त्यांच्या तारुण्याचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. सध्या ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर यांचे रील्स खूप व्हायरल होताना दिसत आहेत.पण दोघांचे डान्स रील्स काहींना पसंतीस पडत आहेत, तर काही लोकांना ते खटकतं आहेत. त्यामुळे या नारकर जोडप्याला ट्रोल केलं जात आहे.