कंगना राणौतच्या 'तेजस'कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, कमाईचा आकडा ऐकून बसेल धक्का

कंगना राणौतचा 'तेजस' हा चित्रपट नुकताच २७ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. आता या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. जे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो.

Updated: Oct 28, 2023, 02:04 PM IST
कंगना राणौतच्या 'तेजस'कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, कमाईचा आकडा ऐकून बसेल धक्का title=

मुंबई : कंगना राणौतचा 'तेजस' हा चित्रपट नुकताच २७ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. आता या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. जे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, कंगना रणौतच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 1.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कंगनाच्या चाहत्यांमध्ये याबद्दल बरीच चर्चा झाली होती, मात्र बॉक्स ऑफिसची स्थिती पाहता, तिकीट विंडोवर मात्र उलट चित्र पाहायला मिळालं. बॉक्सऑफिस कलेक्शन मात्र फेल झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.  

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिंदी मार्केटमध्ये चित्रपटाची व्याप्ती केवळ 5.57 टक्के होती. चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक सर्वेश मेवारा आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कंगनाच्या लूकची खूप प्रशंसा झाली. एअरफोर्स पायलटच्या भूमिकेसाठी कंगनाने खूप मेहनत घेतली होती. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलाच आपटल्याचं दिसत आहे.

कंगनाचा तेजस बॉक्सऑफिसवर आपटला
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कंगना राणौत अयोध्येला गेली होती जिथे तिने 'तेजस'च्या सिनेमाच्या यशासाठी देवाकडे प्रार्थना केली होती. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची केवळ 3000 तिकिटे विकली गेली, ज्यामुळे तेजसला हे नुकसान सहन करावं लागलं. ट्रेड पंडितांवर विश्वास ठेवायचा झाला तर, येत्या वीकेंडमध्ये तेजसच्या कलेक्शनमध्ये किंचित सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. मात्र, बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये कोणतीही मोठी सुधारणा होण्याची आशा कमी आहे. IMDb वर चित्रपटाचं रेटिंग 6.4 आहे.

काय आहे सिनेमाची कहाणी
'तेजस' चित्रपटात कंगनाने एअरफोर्स पायलटची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील कंगनाचे नाव तेजस गिल असून ती एका खास मिशनवर आहे. या मिशनमध्ये तेजस एका भारतीय गुप्तहेरला वाचवताना दिसत आहे. चित्रपटात राम मंदिराचाही उल्लेख आहे. कंगना स्टारर या चित्रपटात आशिष विद्यार्थी, अंशुल चौहान, वरुण मित्रा हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक सर्वेश मेवारा आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कंगनाच्या लूकची खूप प्रशंसा झाली. एअरफोर्स पायलटच्या भूमिकेसाठी कंगनाने खूप मेहनत घेतली होती.