कतरिनाने विकीसाठी घेतला जबरदस्त उखाणा; म्हणाली, कधीही येऊ शकतो सलमान...

प्रत्येक जण या जोडप्याचीच चर्चा करताना

Updated: Dec 18, 2021, 12:16 PM IST
 कतरिनाने विकीसाठी घेतला जबरदस्त उखाणा; म्हणाली, कधीही येऊ शकतो सलमान... title=

मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. कतरिना आणि विकीच्या लग्नाला खूप मर्यादित लोकं आले होते आणि हे लग्न राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये पार पडलं. विकी-कतरिनाच्या हळदी समारंभापासून ते लग्नापर्यंतचे सगळे फोटो त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 

ज्यात विकी आणि कतरिना खूप आनंदी दिसत आहे. पंजाबी पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला आहे. यावेळी दोघांच्या वेडिंग लूक पासून इतर फॅक्शनसाठी त्यांनी केलेल्या लूकपर्यंत प्रत्येक गोष्टीची चर्चा पाहायला मिळाली.

प्रत्येक जण या  जोडप्याचीच चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. आता कतरिनाने विकीसाठी घेतलेला उखाणा सुद्धा समोर आला आहे.जो आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. 

कतरिनाने विकीसाठी खास उखाणा घेतला आहे. तो सुद्धा महाराष्ट्राचे लाडके आदेश भाऊजी यांच्यासमोर... आदेश बांदेकर त्यांच्या शोमध्ये आलेल्या जोडप्याला बऱ्याचादा उखाणा घ्यायला सांगतात. त्यातच आता एक मीम सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात कतरिनाने विकीच्या नावाचा उखाणा घेतला आहे. नवविवाहीत जोडप्यानं कार्य़क्रमात हजेरी लावल्याचं फोटो मध्ये दाखवण्यात आलं आहे. 

हा फोटो एक मीम आहे. ज्यात कतरिना उखाणा घेत म्हणते " उखाणा घेते भाऊजी तुमचा मान राखून... कधीही येऊ शकतो सलमान, विकीराव फुटपाथवर चाला जरा जपून " 

लग्नाच्या चर्चेनंतर कतरिना-विकी यांच्यावर अनेक मीम्स बनवण्यात आले आहेत. हा मीम दोघांचं लग्न पार पडल्यानंतर व्हायरल होऊ लागला आहे. चाहते सुद्धा हे मीम्स एन्जॉय करत आहेत. पण याआधी कतरिनाचा उखाणा सोशल मीडियावर व्हायरल होतच आहे. हा फोटो मीम मेकर्सने तयार केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोबतच आता तयारी सुरू झाली आहे ती म्हणजे लग्नाच्या भव्य रिसेप्शनची. मीडिया रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जात आहे की, विकी कौशल आणि कतरिनाच्या लग्नाचं ग्रँड रिसेप्शन मुंबईत होणार आहे आणि त्यात बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. त्यामुळे लवकरच त्यांच्या रिसेप्शन पार्टीचे फोटो देखील समोर येतील.