श्रीदेवीच्या निधनानंतर बॉलिवूड शोकाकूल, दिग्गजांनी व्यक्त केले दु:ख

श्रीदेवी यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी दु:ख व्यक्त केले.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 25, 2018, 03:26 PM IST
श्रीदेवीच्या निधनानंतर बॉलिवूड शोकाकूल, दिग्गजांनी व्यक्त केले दु:ख title=

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांचे वयाच्या ५४ वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने अवघ्या बॉलिवूड विश्वावर शोककळा पसरली असून, चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. श्रीदेवी यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी दु:ख व्यक्त केले.

अमिताभला सतावतीय गूढ भीती

या शतकाचा महानायक अमिताभ बच्चन यांनी श्रीदेवीच्या निधनानंतर ट्विटरच्या माध्यमातून आपली भावना व्यक्त केली. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, माहित नाही का, पण एक गूढ अशी भीती वाटत आहे.

दु:ख व्यक्त करायला शब्द नाहीत

बॉलिवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्राने म्हटले आहे की, माझ्याजवळ शब्द नाहीत, दु:ख कसे व्यक्त करू.श्रीदेवी यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाबद्दल मझ्या मनात संवेदना आहेत. हा एक काळा दिवस आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. तसेच, त्यांच्या परिवाराला दुख:तून सावरण्याची शक्ती मिळो.

माझी सदाबहार श्रीदेवी राहिली नाही  - प्रिती झिंटा

दरम्यान, अभिनेत्री प्रिती झिंटानेही आपली भावना व्यक्त करत म्हटले आहे की, वृत्त ऐकून मला धक्का बसला. मी दु:खी आणि स्तब्ध आहे. माझी सदाबहार श्रीदेवी राहिली नाही. इश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.