सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शेहनाज गिल प्रेमाबद्दल मत व्यक्त करत म्हणाली...

शेहनाज  'हैसला रख' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

Updated: Oct 14, 2021, 09:26 AM IST
सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शेहनाज गिल प्रेमाबद्दल मत व्यक्त करत म्हणाली... title=

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेन्ड आणि अभिनेत्री शेहनाज गिल पहिल्यांदा सर्वांच्या समोर आली. बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत शेहनाजने प्रेमाबद्दल तिचं मत मांडलं.  शेहनाज म्हणाली, 'जेव्हा आपण कोणावर प्रेम करतो तेव्हा त्याच्यासोबत आपलं भावून नातं तयार होतं. प्रेम असं असतना.... आईचं जे प्रेम असतं... त्या प्रेमाची किंमत फक्त आणि फक्त आईला माहिती असते.. मी आईचं प्रेम अनभवू शकते. कारण माझी आई माझ्यावर प्रचंड प्रेम करते...' शेहनाज  'हैसला रख' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

'हैसला रख' चित्रपटात शेहनाज एका मुलाच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर प्रथमच शहनाज रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. त्यामुळे सिडनाजचे चाहते या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत.

चित्रपटात  तिच्यासोबत अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ दिसणार आहे. 'हौसला रख' चित्रपट 15 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अमरजीत सिंग सरोन यांच्या खांद्यावर आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. 

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेन्ड आणि अभिनेत्री शेहनाज गिल पूर्णपणे कोलमडली आहे. अत्यंत जवळचा व्यक्ती अचानक सोडून गेल्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून चित्रीकरण आणि सोशल मीडियापासून दूर आहे. पण आता  शेहनाज तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.