Sushant Singh Rajput च्या निधनाच्या 2 वर्षांनंतर रिया चक्रवर्ती पुन्हा रिलेशनशिपमध्ये? कोण आहे नवीन बॉयफ्रेंड

Sushant Singh Rajput च्या निधनानंतर Rhea Chakraborty चर्चेत आली असून ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. 

Updated: Dec 8, 2022, 06:08 PM IST
Sushant Singh Rajput च्या निधनाच्या 2 वर्षांनंतर रिया चक्रवर्ती पुन्हा रिलेशनशिपमध्ये? कोण आहे नवीन बॉयफ्रेंड title=

Rhea Chakraborty In Relationship : बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) सतत चर्चेत होती. सुशांतच्या मृत्यूसाठी कुठेतरी तिला जबाबदार धरण्यात आलं. सध्या रिया ती रिलेशनशिपमध्ये आली या बातमीमुळे चर्चेत आली आहे. आता रिया ही सोहिल खान याची पूर्वाश्रमीची पत्नी सीमा सजदेहचा (Seema Sajdeh) भाऊ बंदी सजदेहसोबत (Bunty Sajdeh) रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. बंटी टी स्पोर्ट्स आणि एन्टरटेन्मेंटच्या जगातील मॅनेजमेंट कंपनींपैकी एका कंपनीचा मालक आहे. 

कोण आहे बंटी सजदेह? 

बंटी सजदेह हा मुंबईतील एक मोठा उद्योगपती आहे. 'हिंदुस्तान टाइम्स'नं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, रियाचे ज्या बंटी सजदेहला डेट करत आहे तो टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीचे मालक आहे, तर रिया देखील त्याची क्लायंट आहे. रिपोर्ट्सनुसार, रिया आणि बंटी बऱ्याच दिवसांपासू एकमेकांना डेट करत असून एवढ्यात ही गोष्ट समोर यायला नको अशी त्यांची इच्छा आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

2018 च्या अखेरीस रिया आणि सुशांत रिलेशनशिपमध्ये आले होते. तर 2019 च्या सुरुवातीला दोघेही लिव्ह-इनमध्ये राहू लागले होते. जरी दोघेही त्यांच्या नात्याबद्दल कधीच उघडपणे बोलले नव्हते.  परंतु सुशांतच्या मृत्यूच्या एका महिन्यानंतर तिने सोशल मीडियावर स्वतःला त्याची गर्लफ्रेंड असल्याचे उघडपणे सांगितले होते. रियाने अमित शहा यांच्याकडे सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : Ajay Devgn च्या एकूण संपत्तीत प्रायव्हेट जेट पासून या गोष्टीं, रक्कम ऐकून व्हाल थक्क

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, बंटीचं नाव पहिल्यांदाच रियाशी जोडले गेले नाही तर अभिनेत्री सुष्मिता सेन आणि सोनाक्षी सिन्हाशीही जोडण्यात आले होते. तर या आधी तो अनेक अभिनेत्रींसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात होते. (after sushant singh rajput death rhea chakraborty now dating seema sajdeh brother bunty says reports)