VIDEO : 'ॲनिमल' ला मिळालेलं यश पाहता बॉबी देओलला अश्रू अनावर

Animal Bobby Deol : 'ॲनिमल' या चित्रपटाला मिळालेलं यश पाहता बॉबी देओल झाला भावूक, व्हिडीओ होतोय व्हायरल

दिक्षा पाटील | Updated: Dec 3, 2023, 10:59 AM IST
VIDEO : 'ॲनिमल' ला मिळालेलं यश पाहता बॉबी देओलला अश्रू अनावर title=
(Photo Credit : Social Media)

Animal Bobby Deol : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल हा सध्या त्याच्या 'ॲनिमल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटातील अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. खरंतर बॉबीनं या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय असं म्हणायला हरकत नाही. चित्रपटानं दोन दिवसात 130 कोटींची कमाई केली आहे. अशात एका कार्यक्रमा दरम्यान, बॉबी देओल भावूक झाला आहे. इतकंच नाही तर त्याला अश्रू अनावर झाले आहेत. 

'ॲनिमल' विषयी एकच चर्चा सुरु आहे. प्रेक्षक त्याची स्तुती करत आहेत. अशात नुकत्याच एका कार्यक्रमा दरम्यान, पापाराझी देखील बॉबीची स्तुती करताना दिसले. या दरम्यान, बॉबी भावूक झाला आणि त्याला अश्रू अनावर झालेत. सध्या व्हायरल होत असलेला बॉबीचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. त्या व्हिडीओत तो आधी पापाराझींशी बोलताना दिसतोय. त्यानंतर तो पापाराझींना धन्यवाद बोलतो आणि त्याच्याशी बोलताना दिसतो. त्यानंतर प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमाविषयी बॉबी बोलताना दिसतो. हे सगळं झाल्यानंतर गाडीकडे जात असताना बॉबी भावूक होतो आणि त्याला अश्रू अनावर होतात. बॉबी गाडीत बसूनही रडताना दिसतो. बॉबी बोलतो की चित्रपटाला जितकं प्रेम मिळतंय ते पाहून वाटतं की मी स्वप्न पाहतोय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'ॲनिमल' च्या बॉक्स ऑफिसविषयी बोलायचे झाले तर दुसऱ्या दिवशी देखील या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानं पहिल्या दिवशी 63.8 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 66 कोटींची कमाई केली. तर सगळ्या भाषेतील चित्रपटांची एकूण कमाई पाहायचे झाले तर चित्रपटानं दोन दिवसात 129.80 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी फक्त हिंदीत या चित्रपटानं 54.75 कोटींची कमाई केली होती. 

हेही वाचा : 'शेवटी बायकोच असते ती...'; रश्मिकाला मिठी मारताना आलियानं दिलेले एक्सप्रेशन पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

सोशल मीडियावर चित्रपटातील अनेक क्लिप्स व्हायरल होत आहेत. एकीकडे रणबीरची चर्चा सुरु असताना दुसरीकडे बॉबी देओलनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. बॉबी देओलचे चित्रपटात काहीच सीन आहेत. तरी त्यातून त्यानं प्रेक्षकांची मने जिंकली. तर अनेकांनी आशा केली आहे की त्याचा स्क्रिन टाइम हा जास्त हवा होता. तर दुसरीकडे रश्मिका आणि तृप्ती डिमरी यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. तृप्ती आणि रणबीरचा न्यूड सीन देखील सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन हे संदीप रेड्डी वांगा यांनी केले आहे.