दयाबेनमागोमाग जेठालालही घेणार मालिकेतून ब्रेक! अभिनेत्याच्या व्हिडीओमुळं चर्चांना उधाण

Dilip Joshi : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतून दयाबेननं पाठोपाठ जेठालालची भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशी देखील मालिकेतून ब्रेक घेणार आहे. व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानंच सांगितलं कारण...

दिक्षा पाटील | Updated: Sep 30, 2023, 10:30 AM IST
दयाबेनमागोमाग जेठालालही घेणार मालिकेतून ब्रेक! अभिनेत्याच्या व्हिडीओमुळं चर्चांना उधाण title=
(Photo Credit : Social Media)

Dilip Joshi : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. सतत कलाकार शूट करताना दिसतात. त्यामुळे त्यांना ब्रेकही मिळत नाही. या कार्यक्रमातील कलाकारांनी आपल्या प्रेक्षकांच्या मनात जागा केली आहे. त्यात जेठालाल ही देखील एक अशीच भूमिका आहे. दरम्यान, ही भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामुळे ते शोमधून ब्रेक घेणार आहेत, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. 

दिलीप यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत दिलीप जोशी हे स्वामीनारायण मंदिरात होणाऱ्या एका खास कार्यक्रमासाठी दारेसलामला गेले आहेत. जेव्हा दिलीप जोशी यांच्या चाहत्यांना ही माहिती मिळाली त्यांना आश्चर्य झाले. कारण दिलीप जोशी सोशल मीडियावर इतके सक्रिय नसतात. त्यामुळे चाहत्यांना थेट व्हिडीओ पाहायला मिळाला त्यांना त्या व्यतिरिक्त फोटो किंवा काही पाहायला मिळालं नाही. त्यांची शेवटची पोस्ट ही त्यांच्या धार्मिक यात्रेविषयी अनेक गोष्टी सांगते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

स्वामीनारायणच्या बीएपीएसच्या समुदायाकडून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम अबू धाबीला असणार आहे. तर स्वामीनारायणच्या बीएपीएसच्या समुदाय लवकरच तिथे एक खूप भव्य असं स्वामीनारायण मंदिर बनवणार आहे. दिलीप यांनी लिहिलं की 'जय स्वामीनारायण ऐसे जरूरी और खुशी के अवसर के लिए हार्दिक निमंत्रण!'

हेही वाचा : Gadar 2 ने घडवलेला इतिहास एका दिवसात पुसला; Jawan सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट!

'तारक मेहता का उल्टा चष्मा' च्या गोकुलधाम रहिवांशांनी गणेश चतुर्थीला धुमधाममध्ये सुरुवात केली आणि बाप्पाचे स्वागत केले. जेठालालनं खुलासा केला की आता ते गणेशोत्सवचा भाग होणार नाहीत. बाप्पाचे स्वागत आणि पहिली आरती केल्यानंतर जेठालाल इंदूरला रवाना झाले. त्यामुळे मालिकेत आता काही दिवस जेठालाल दिसणार नाही, तर ते बाहेर गेल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेत असा ट्रॅक दाखवण्याचं कारण हे त्यांनी मालिकेतून घेतलेला ब्रेक आहे. दरम्यान, आता जेठालाल परत कधी मालिकेत दिसणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला असून ते त्यांची येण्याची आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत.