सलमानसोबत शहनाज दिसताच चाहत्यांना आठवतयं सिद्धार्थ मल्होत्राचं जुनं ट्वीट

शहनाज गिल पार्टीतून बाहेर पडताच सलमानसोबतचं खास बॉन्डिंग दाखवून लाइमलाइटमध्ये आली. 

Updated: May 7, 2022, 07:15 PM IST
सलमानसोबत शहनाज दिसताच चाहत्यांना आठवतयं सिद्धार्थ मल्होत्राचं जुनं ट्वीट title=

मुंबई : शहनाज जबरदस्ती सलमान खानला चिकटून आहे. असं ट्रोलर्सचं म्हणणं आहे. लोकं शहनाजला चिपकूही म्हणत आहेत. शहनाजच्या जबरदस्त ट्रोलिंग दरम्यान, तिचा खास मित्र सिद्धार्थ शुक्लाचं जुनं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिद्धार्थचं हे ट्विट महिलांच्या सन्मानाबद्दल बोलत आहे. यंदा सलमान खानची बहीण अर्पिता खानच्या घरी झालेली ईद पार्टी लक्षात राहील. या पार्टीत खूप दिवसांनी सेलेब्स एकत्रित उपस्थित होते.

या पार्टीला चार चाँद लावण्यासाठी शहनाज गिलही पोहोचली होती. शहनाज गिल पार्टीतून बाहेर पडताच सलमानसोबतचं खास बॉन्डिंग दाखवून लाइमलाइटमध्ये आली. मात्र दबंग खानसोबतच्या या जवळीकीतेमुळे शहनाज ट्रोल होत आहे.

सलमानसोबत दिसली शहनाज, का झाली ट्रोल?
समोर आलेला हा व्हिडिओ ज्यामध्ये शहनाज गिल पापाराझींसमोर सलमान खानसोबतची जवळीक दिसत आहे. शहनाज गिल सलमान खानसोबत चिटचॅट करताना तर कधी त्याला किस करताना दिसतेय. तर त्याला कधी मिठी मारताना दिसत आहे, तर कधी कानात कुजबुजते. 

यानंतर शहनाज गिलने सलमान खानचा हात ओढला आणि त्याला तिच्या कारजवळ नेलं आणि दबंग खानला सोडण्यास सांगितलं. सलमान आणि शहनाजची बॉन्डिंग जिथे काही लोकांना क्यूट वाटली. तिथे अनेकांना शहनाजची ही वागणूक अजिबात आवडली नाही.

सिद्धार्थचे ट्विट व्हायरल
दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांनी ट्विटमध्ये लिहिलं, तुम्ही स्त्रीबद्दल जे काही ऐकता, ते नेहमी लक्षात ठेवा की ही अफवा एकतर अशा पुरुषाकडून आली आहे ज्याला ती मिळाली नाही किंवा अशा स्त्रीकडून.तिच्याशी कोण स्पर्धा करू शकत नाही...

 

 सिद्धार्थचे हे ट्विट 2015 सालचं आहे. यावेळी तो दिल से दिल तक या मालिकेत काम करत होता. शोमधील त्याचा प्रवास बराच वादग्रस्त ठरला होता. शोमधील त्याची को-स्टार रश्मी देसाईसोबत त्याचा वाद झाला होता. 

सिद्धार्थ आणि शहनाजबद्दल बोलायचं झालं तर ते बिग बॉस 13 मध्ये भेटले होते. शोमध्ये दोघांमध्ये चांगली मैत्री होती. जी शो संपल्यानंतरही कायम होती. सिद्धार्थ यांची भेट बिग बॉस 13 मध्ये झाली होती. शोमध्ये दोघांमध्ये चांगली मैत्री होती. जी शो संपल्यानंतरही कायम होती. सिद्धार्थच्या जाण्याने शहनाजला मोठा धक्का बसला.