धक्कादायक... 26 वर्षीय अभिनेत्रीची हत्या, तिच्यासोबत घडलेली घटना हादरवणारी

क्रूरतेचा कळस... प्रसिद्ध अभिनेत्रीची हत्या, महिन्याभरापूर्वी तिच्यासोबत जे घडलं ते अत्यंत धक्कादायक   

Updated: Apr 1, 2022, 03:04 PM IST
धक्कादायक... 26 वर्षीय अभिनेत्रीची हत्या, तिच्यासोबत घडलेली घटना हादरवणारी  title=

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. तिच्यासोबत जे घडलं ते वाचल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसेल. 26 वर्षीय अभिनेत्रीला एका बँकरने पहिल्यांदा हातोडीने मारलं, त्यानंतर अभिनेत्रीच्या मृतदेहाचे तुकडे करून, ते तुकडे गोणीत भरून रस्त्याच्या कडेला फेकून दिले. 

सध्या पोलिसांनी अभिनेत्रीची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. डेव्हिड फोंटाना असे या आरोपीचे नाव असून त्याचे वय 43 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेने परिसरात एकचं खळबळ माजली आहे. 

अभिनेत्रीचं नाव कॅरल माल्टेसी 
कॅरोल माल्टेसी असे मृत अभिनेत्रीचे नाव असल्याचं सांगितलं जात आहे. 20 मार्च रोजी लोम्बार्डी भागातील पालिन गावाजवळील एका कड्यावर महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला होता.

यूके डेली मिररनुसार, सर्वप्रथम पीडित महिलेवर हातोडीने वार झाले असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपीने ओळख लपवण्यासाठी मृतदेहाला जळले. पोलिसांनी मंगळवारी डेव्हिड फोंटाना नावाच्या 43 वर्षीय व्यक्तीला अटक केली. 

आरोपीवर खून, पुरावे नष्ट करणे, मृतदेह लपवणे असे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. चौकशीदरम्यान आरोपी बँकरने अभिनेत्रीची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याने जानेवारीमध्ये अभिनेत्रीची हत्या करून मृतदेह काही दिवस फ्रीझरमध्ये ठेवला होता. सुमारे महिनाभरानंतर अभिनेत्रीचं मृतदेह फेकून देण्यात आला.