आदित्य नारायणच्या लेकीचं अनोखं नाव, अर्थ खूपच महत्वाचा

आदित्यच्या मुलीच्या नावाचा खरा अर्थ अतिशय सुंदर  

Updated: Mar 10, 2022, 04:42 PM IST
आदित्य नारायणच्या लेकीचं अनोखं नाव, अर्थ खूपच महत्वाचा  title=

मुंबई : बॉलिवूड गायक आदित्य नारायण  (Aditya Narayan) नुकताच एका गोंडस मुलीचा बाबा झाला आहे. पत्नी श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) ने मुलीला जन्म दिला आहे. स्वतः आदित्यने ही गोड बातमी शेअर केली आहे. आदित्यने आपल्या लेकीच नाव खूप सुंदर ठेवलं आहे. महत्वाचं म्हणजे त्याने मुलीच्या नावाचा अर्थ देखील शेअर केलाय. 

मुलीचं नाव अतिशय सुंदर 

आदित्यने इंस्टाग्रामवर (Aditya Narayan) वर  Ask Me Session मध्ये आपल्या मुलीच्या नावाचा खुलासा केला आहे. 

आदित्यला चाहत्यांनी त्याच्या मुलीचं नाव विचारलं. तेव्हा त्यांनी मुलीचं नाव 'त्विशा नारायण झा' असल्याचं म्हटलं. 

तिच्या नावाचा अर्थ रोशनी, सुर्याची किरणे. माझ्या वडिलांच्या नावाचा अर्थ आहे सुरज. माझ्या नावाचा अर्थ देखील तोच आहे. त्यामुळे मुलीच्या नावाचा अर्थ देखील तसाच शोधला. यामध्ये श्वेताचं नाव देखील आहे.  

Aditya Narayan Aditya Narayan Aditya Narayan

बिग बॉसमध्ये होणार सहभागी?

आदित्यन देखील या सत्रादरम्यान स्पष्ट केले आहे की तो 'बिग बॉस OTT 2' चा भाग नाही. आदित्यने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान एका चाहत्याने त्याला विचारले की, खूप बातम्या येत आहेत.

सध्या तू 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये येत आहेस. हे खरे की खोटे? याला उत्तर देताना तो म्हणाला, 'मी सर्वांना आधीच स्पष्ट करू इच्छितो की मी कधीही 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये दिसणार नाही.

बॉस' एक स्पर्धक म्हणून माझ्याकडे यासाठी वेळ नाही आणि माझा याकडे कोणताही कल नाही.